Know anout Chunar fort with a glorious history
गौरवशाली इतिहास असणारा चुनारचा किल्ला, एकदा नक्की भेट द्या By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 2:49 PM1 / 9टिव्हीवरील मालिका चंद्रकांता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या मालिकेत उल्लेख असलेल्या चुनारच्या किल्लाबदद्ल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2 / 9उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ मिर्झापूर आहे. या ठिकाणापासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर गंगेच्या किनारी चुनार चा किल्ला वसलेला आहे. टॅकोर परिसरात हा किल्ला प्रमुख आकर्षण आहे.3 / 9अनेक पौराणिक कथांमध्ये या किल्ल्याचा संदर्भ दिसून येतो. विक्रमादित्यने आपला भाऊ भर्तृहरी यांच्यासाठी हा किल्ला तयार केला होता. या किल्लात ५२ खांब तसंच एक सुर्यघडी सुद्धा आहे. 4 / 9स्थानिक लोकांच्यामते जेव्हा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा या किल्ल्यातील लोकांनी शरणागती पत्करली. 5 / 9गंगेच्या परिसरात हा किल्ला आहे. हजारो वर्ष जुना असलेल्या या किल्ल्याचा जिर्णोद्धार राजा विक्रमादित्य यांनी केला होता.6 / 9अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.7 / 9जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर जवळचं असलेलं विमानतळ वाराणसी हे आहे. नंतर तुम्ही रस्त्याने चुनारपर्यंत पोहचू शकतात. 8 / 9मिर्जापुर नॅशनल हायवेपासून तुम्हाला या ठिकाणी सहज येता येईल. वाराणसीवरून बस सुद्धा उपलब्ध होतात. 9 / 9त्या किल्ल्याला अनेक दालनं आहेत. किल्ल्यामध्ये वेगळं महत्व प्राप्त असेलल्या या किल्ल्याला नक्की भेट द्या. आणखी वाचा Subscribe to Notifications