शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय सैनिकाचं 'असं' मंदिर जिथे चिनी सैनिक सुद्धा करतात वंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 12:33 PM

1 / 10
सिक्किम हे भारतातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पण पर्यटनासोबतच अनेक ऐतिहासीक गोष्टींसाठी सुद्धा सिक्किची ओळख आहे. राज्यातील सांस्कृतिक जीवन हे तिबेटीयनांच्या धार्मिक व सौंदर्यविषयक परंपरांशी निगडित आहे. आज आम्ही तुम्हाला सिक्कीमच्या सैनिकाबद्दल सांगणार आहोत.
2 / 10
सिक्किममध्ये भारत आणि चीनच्या सीमेवर एक सैनिक मरणानंतर ४८ वर्षांनंतर सुद्धा सीमेचे रक्षण करत आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या मागची गोष्ट काय आहे ती जाणून घ्या. भारतीय सैनिक बाबा हरभजन सिंह यांच्या मंदिरात चिनी सैनिक सुद्धा वंदन करतात.
3 / 10
या सैनिकाचे मंदिर १४ हजार फुटांवर तयार केलेले आहे. अनेक लोक लांबून यांचे दर्शन घेण्यासाठी येतात.
4 / 10
सिक्किमची राजधानी गंगटोक येथे जेलेप दरी आणि नाथुला दरी आहे . यांच्यामधोमध बाबा हरभजन सिंह यांचे मंदिर तयार करण्यात आले आहे.
5 / 10
भारत आणि चीनच्या बॉर्डरवर बर्फाच्या पर्वतावर या बाबांचे मंदिर आहे. बाबा हरभजन यांना वंदन करत नाही, असा भारतीय सेनेचा एकही असा शिपाई नाही
6 / 10
यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील गुजरांवाला या जिल्ह्यात झाला होता. सदरना हे त्यांचे जन्म गाव होते. ३० ऑगस्ट १९४६ मध्ये बाबा हरभजन सिंह यांचा जन्म झाला.
7 / 10
बाबा हरभजन सिंह हे २३ व्या पंजाब बटालियनचे सैनिक होते. त्यांनी १९६६ साली सैन्यदलात प्रवेश घेतला. यांना नथुलाचा हिरो असं सुद्धा म्हटलं जात होतं.
8 / 10
भारतीय सेनेचे पंजाब रेजिमेंटचे शिपाई हरभजन यांचा ४ ऑक्टोबर १९६८ ला एका खोल नाल्यात पडून मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे मृत शरीर सुद्धा सापडलं नव्हतं. तसंच त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती सुद्धा प्राप्त झाली नव्हती.
9 / 10
तेथिल स्थानिक लोकांचं असं मत आहे की बाबा हरभजन यांचा आत्मा आज सुद्धा सीमेचं रक्षण करत आहे.
10 / 10
सैन्याने या बाबांचे मंदिर तयार केले आहे. या मंदिरात बाबांचा फोटो आणि त्यांचा सामान ठेवला आहे. बॉर्डरवर होत असलेल्या भारत आणि चीन यांच्या फ्लॅग मीटिंगमध्ये बाबा हरभजन यांचासाठी एक वेगळी खुर्ची ठेवली जाते. असं सिक्किमच्या सीमेवरच्या लोकांचं म्हणणं आहे.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIndiaभारतsikkimसिक्किमchinaचीन