शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेशातील 6 डेस्टिनेशन्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 3:00 PM

1 / 7
जवळपास संपूर्ण भारतामध्ये मान्सूचं दणक्यात आगमन झालं असून सगळीकडे पावसाच्या सरीं बरसत असल्याचे समजत आहे. अशातच तुम्हीही मान्सून व्हेकेशनसाठी काही प्लॅन करण्याचा विचार करत आहात का? मग तुम्ही मध्येप्रदेशला नक्की भेट द्या. जर तुम्हाला अॅडव्हेंचर्स करण्यासोबत पावसाचा आनंद अनुभवायचा असेल तर आम्ही तुम्हाला सुंदर अशी 5 डेस्टिनेशन्सबाबत सांगणार आहोत. जिथे तुम्ही निसर्गरम्य वातावरणासोबतच पावसाचा आनंदही घेऊ शकाल.
2 / 7
जर तुम्ही नेचर लव्हर असाल आणि तुम्हाला निसर्गाचा जवळून आस्वाद घेण्याची इच्छा असेल, तर हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी बेस्ट आहे. मध्येप्रदेशची राजधानी भोपाळपासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन मान्सूनमध्ये आणखी सुंदर दिसतं. सातपुडाच्या पर्वतरांगांनी वेढलेलं हे हिल स्टेशन मान्सूनमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतं.
3 / 7
तसं पाहायला गेलं तर येथे वर्षभर वातावरणं सुंदर असतं. परंतु पावसाळ्यामध्ये येथील नयनरम्य दृश्य पाहण्यासारखी असतात. अफगाण आक्रिटेक्चरचं उत्तम उदाहरण म्हणजे, येथील किल्ल्ये पावसाळ्यामध्ये हिरवळीची जणू शालच पांघरल्याप्रमाणे दिसत असतात. अशातच हिरव्यागार वातावरणामध्ये ऐतिहासिक स्थळांचं दर्शन करण्याची गंमत काही औरच... येथून इंदौर जवळपास 90 किलोमीटर अंतरावर आहे.
4 / 7
जबलपूरमध्ये असलेलं भेडघाट एमपीच्या रमणीय स्थळांपैकी एक आहे. हा धबधबा एखाद्या विदेशी धबधब्याप्रमाणेच दिसतो. येथे नर्मदा नदीचं पाणी अगदी उंचावरून कोसळतं. रात्री पडणारं चंद्राच्या लखलखत्या चांदण्यामध्ये संगमरवरच्या उंच-उंच पर्वतरांगा भेडाघाटचं सौंदर्य आणखी उजळवून टाकतात. हे ठिकाण जबलपूरपासून फक्त 23 किलोमीटर दूर आहे.
5 / 7
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ एक सुंदर टूरिस्ट स्पॉट आहे. भोपाळला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. येथील तलाव पावसाळ्यामध्ये फार सुंदर दिसतात. पर्यटक येथे छोटा तलाव, मोठा तलाव, भीम बैठका, अभयारण्य, शहीद भवन आणि भारत भवन पाहण्यासाठी येतात. येथए जवळपास 28 किलोमीटर अंतरावर भोजपूर मंदिर आहे.
6 / 7
जर तुम्हाला फिरण्यासोबतच अॅडव्हेंचरचाही आनंद घेण्याची इच्छा असेल तर भोपाळपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर समरधा ट्रॅक आहे. येथ तुम्हाला ट्रॅकिंग करण्यासाठी फरोस्ट गेस्ट हाउसमध्ये एन्ट्री फी द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही येथील 10 किलोमीटर ट्रॅकिंगचा आनंद घेऊ शकता.
7 / 7
तसं पाहायला गेलं तर झरा वर्षभर वाहत राहतो. पण पावसाळ्यामध्ये येथे पाणी वाढल्यामुळे याचा आनंद द्विगुणित होतो. कॅरीमहादेवाच्या नावाने ओळखलं जाणारं हे डेस्टिनेशन राजधानीपासून 25 किलोमीटर दूर आहे. याबाबत असं सांगितलं जातं की, या झऱ्याचा उगम भगवान शंकरांच्या जटांमधून झाला असल्याचं सांगण्यात येतं.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशलtourismपर्यटन