शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' 10 ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य तुम्हाला नक्कीच भूरळ पाडेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 3:19 PM

1 / 11
ताजमहालचा समावेश जगातील आठ आश्चर्यांमध्ये करण्यात येतो. या ऐतिहासिक मकबऱ्याचं सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येथे येत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? ताजमहालव्यतिरिक्त अनेक अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. ज्या आपलं एक वेगळं अस्तित्वासोबतच त्यांच्या सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 इमारतींबाबत सांगणार आहोत.
2 / 11
दिल्लीमध्ये असलेला हुमायूचा मकबरा मुघल वास्तुकलेचं एक सुंदर उहाहरण आहे. 16व्या शतकातील या मकबऱ्याचा समावेश यूनेस्कोच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये जाणार असाल तर ही इमारत नक्की पाहा.
3 / 11
हिमालयाच्या कुशीत वसलेला बा प्राचीन बौद्ध मठ तुम्ही पाहिलाय का? स्पीति व्हॅलीमधील एका डोंगरावर स्थित असलेला हा मठ खरचं फार सुंदर आहे. तसेच स्पीत आणि पिन नदीच्या संगमावर हा मठ वसलेला आहे.
4 / 11
चित्तोडचा किल्ला राजस्थानच्या सर्वात भव्य किल्ल्यांमधील एक आहे. ही एक वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. चित्तोड मेवाडची राजधानीचं शहर होतं आणि चित्तोड किल्ला वीर राजपूतांच्या त्यागाचं बलिदान आणि शौर्यगाथेचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.
5 / 11
महाबत मकबरा गुजरातमधील जुनागढमध्ये स्थित आहे. सुरूवातीला याला जुनागढचा नवाबाचा महल म्हणून ओळखलं जात असे. आपल्या सुंदर वास्तूकलेसाठी ओळखली जाणारी ही वास्तू मुघल स्मारकांपैकी एक आहे.
6 / 11
एकदम सरळ उभ्या असलेल्या डोंगरावर 400 फूट उंचावर स्थित आहे राजस्थानमधीव जोधपूरचा मेहरानगढ किल्ला. भारतातील सर्वात भव्य आणि विशाल किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्लावरून ब्लू सिटी म्हणून ओळखल्या जणारं संपूर्ण जोधपूर शहर तुम्ही पाहू शकता.
7 / 11
म्हैसूर महाल आपल्या भव्यतेसोबतच आलिशान बगिचे आणि शाही अंदाजासाठी ओळखलं जातं. कर्नाटकमधील म्हैसूरच्या राजांचं महल आहे आणि देशातील सर्वात सुंदर वास्तूंपैकी एक आहे. या वास्तूला अंबा विलास या नावानेही ओळखलं जातं.
8 / 11
हे सूर्य मंदिर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा गावामध्ये पुष्पापति नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. हे मंदिर सूर्यवंशी सोलंकी राजा भीमदेव पहिला याने 1026 ई. मध्ये तयार केलं होतं.
9 / 11
खजुराहो मंदिर भारतीय स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना आहे. चंदेल राजांद्वारे तयार करण्यात आलेल्या या सुंदर मंदिरांमधील शिल्प एवढी सुंदर आहेत की, अनेकदा ती खरी असल्याचा भासही होतो.
10 / 11
जयपूरच्या बाहेरील ठिकाणांवरील उंच डोंगरांमध्ये स्थित आमेर फोर्टवर तुम्हाला हिंदू आणि मुघल संस्कृतीतील कलाकृती पाहायला मिळतील.
11 / 11
ताज महालाच्या शेजारीच असलेला आगऱ्याचा किल्ला आपल्या अद्भूत सौंदर्यासाठी ओळखला जातो. हे यूनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. जे भारतामध्ये मुघलांद्वारे तयार करण्यात आलेल्या उत्तम किल्ल्यांपैकी एक आहे. 16व्या शतकामध्ये लाल दगडांपासून तयार करण्यात आलेल्या या किल्ल्यामध्ये अनेक महाल, मशिदी आहेत.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIndiaभारतtourismपर्यटनTaj Mahalताजमहाल