long weekend trip best places to visit under budget in india
'या' सुंदर ठिकाणांची करा सैर; ताण-तणाव होईल दूर By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 4:38 PM1 / 7कामातून विश्रांती मिळावी म्हणून फिरण्याचा बेत आखला जातो. सध्या पावसाळा सुरू असून निसर्ग हिरवाईने नटलेला आहे. कमी खर्चात कोणत्या ठिकाणी जाऊ शकता हे जाणून घेऊया. 2 / 7अमृतसर येथील सुवर्ण मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे फिरायला जाण्याचा नक्की विचार करता येईल. यासोबतच जालियनवाला बाग, दुर्गियाना मंदिर, रामतीर्थ यासारख्या काही ठिकाणांना ही भेट देता येईल. 3 / 7महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गाच्या कुशीत हॉटेल, रिसॉर्टच्या माध्यमातून राहण्याचीही उत्तम सोय असल्याने कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे4 / 7उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील महत्वाचे राज्य असून देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळं आहेत.5 / 7फिरण्यासाठी हरियाणा हे देखील एक उत्तम ठिकाण आहे. अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात.6 / 7राजस्थानला एकदा पावसाळ्यात नक्की भेट द्या. येथील सरोवरांमधील स्वच्छ पाणी आणि आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा तुम्हाला खरचं प्रसन्न करतील.7 / 7दार्जिलिंगपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर कुर्सेओंग असं सुंदर ठिकाण आहे. हे एक लोकप्रिय थंड हवेचं ठिकाण असून अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications