- अमृता कदमरोजच्या रूटिनचा कंटाळा आलाय, आयुष्यात थ्रील-एक्साइटमेंट हवी आहे, तर मग फिरायला निघा. पण नेहमीसारखं भटकून भटकून पर्यटनस्थळं पहायचा विचार करत असाल, तर जरा थांबा...काही हटके करण्याचा विचार करा. टेन्टमध्ये राहाणं, कँम्प फायर आणि जोडीला साहसी खेळ असतील तर तुमच्या प्रवासाचा आनंद नक्कीच द्विगणित होईल. आपल्याकडे अशी अनेक ठिकाणं आहेत, जी आज केवळ कँम्पिंगसाठीच प्रसिद्ध आहेत.1.ॠषीकेशतरु णांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं हे कँम्पिंग डेस्टिनेशन आहे. उत्तराखंडमधल्या या ठिकाणी तरूणाई इथल्या साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येते. इथल्या पर्वरांगांच्या पायथ्याशी किंवा गंगेच्या तीरावर तुम्हाला राहण्यासाठी तंबूही मिळतात. गंगेच्या पाण्याचा आवाज आणि गार वारा, तंबूत घालवेली ती रात्र तुम्ही कधीच विसरणार नाही. रिव्हर राफ्टिंग हा इथला सगळ्यांत लोकप्रिय असा अडव्हेंचर स्पोर्ट आहे. 2.सोलांग व्हॅलीमनालीपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलांग व्हॅलीमध्ये ग्लेशियर्स आणि हिमाच्छादित पर्वतरांगाचं विलोभनीय दर्शन घडतं. ट्रेकिंग आणि कँम्पिंग दोन्हीसाठी हे अत्यंत आयडियल ठिकाण. हिवाळ्यात इथे स्कीइंगचा आनंद घेता येतो. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर स्कीइंगची जागा पॅराग्लायिडंग, पॅराशूटिंग, झॉर्बिंगसारखे खेळ घेतात. इथे ‘ अटलबिहारी वाजपेयी इन्स्टियूट आॅफ माऊंन्टेनिरींग अॅण्ड अलायड स्पोर्टस’ आहे. जिथे साहसी खेळांचं रितसर प्रशिक्षणही घेता येतं. 3.निओरा व्हॅली जंगल कँपपश्चिम बंगाल, भूतान, सिक्किम बॉर्डरला लागून असलेली निओरा व्हॅली ही पूर्वोत्तर भारतातली कँम्पिंगसाठीचं महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. 2007 पासून इथे पर्यटनाची सुरूवात झाली. इथून कांचनजुंगा या जगातील दुसऱ्या क्र मांकाच्या उंच शिखराचं थेट दर्शन होतं. कँम्पिग साइटच्या आजूबाजूला असलेल्या एक्सकर्शन्समुळे तुमचा इथला मुक्काम अविस्मरणीय ठरतो. फक्त लांबचा प्रवास असल्यामुळे तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असला पाहिजे इतकंच! 4.कसौलहिमाचल प्रदेशातलं हे छोटसं हिलस्टेशन पार्वती नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. या नदीच्या किनाऱ्यावरच तुम्हाला अनेक कँम्पिंग साइटस पहायला मिळतात. तंबूतून बाहेर नजर टाकली तरी सूचीपर्ण वृक्षाची गर्द वनराई तुमच्या मनाला आणि डोळ्यांनाही विसावा देते. इथे ट्रेकिंगसाठीही पिन पार्वती पास, खीर गंगा, सर पास आणि यांकेर पाससारख्या जागा आहेत. त्यामुळे कसौलला ट्रेकर्सचीही पसंती मिळते.5.जिम कॉर्बेट नॅशनल पार्कजंगातल्या वास्तव्याचा फर्स्ट हॅण्ड अनुभव घ्यायचा असेल तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कसारखी उत्तम जागा नाही. जंगल सफारी, संध्याकाळची शेकोटी आणि रात्रीच्या शांततेला छेद देणारी रातकिड्यांची किरकिर आणि घुबडांचं घुमणं यापेक्षा एक्सायटिंग अजून काय असू शकतं? इथल्या काही कँम्पिंग साइट्समध्ये तुमच्या विनंतीनुसार लोकनृत्यंही सादर केली जातात. 6.कूर्गभारताचं स्कॉटलंड म्हणून ओळखलं जाणारं हे टुमदार हिलस्टेशन तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्याचा एक वेगळाच आनंद देतं. चहा-कॉफीच्या मळ्यातून जाणारे रस्ते आणि पश्चिम घाटाचं अद्भुत सौंदर्य यांमुळे तुमच्या कँम्पिंगची मजाच डबल होते. बेट्टागिरीच्या जवळ मस्त तंबू टाकायचे आणि इथल्या निसर्गाशी एकरु प होऊन जायचं.7.अंजुना बीच गोवागोव्यातील प्रत्येक बीचची स्वत:ची अशी खासियत असली तरी कँम्पिगसाठीचं उत्तम ठिकाण म्हणजे अंजुना बीचच.8.जैसलमेरराजस्थानच्या वाळंवटात राहण्याचा, तिथल्या संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर जैसलमेरला जायलाच पाहिजे. इथल्या सेराई लक्झरी कँम्पमध्ये तुम्हाला राजस्थानची झलक पहायला मिळते. सोनेरी वाळूतल्या तंबूंमध्ये राहताना राजस्थानी जेवण, संगीत यांचा आस्वाद घेता येतो.