luxury floating hotel the arctic bath opens at icy water in sweden ; You can see northern lights
बर्फाळलेल्या प्रदेशात पाण्यावर तरंगणारे हॉटेल; भाडे सोडा, नजारे पाहूनच म्हणाल अद्भूत By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 11:05 AM1 / 13स्वीडनच्या उत्तरेकडील लॅपलँड क्षेत्रामध्ये ल्यूल नदीवर तरंगणारे हॉटेल आणि स्पा 'द आर्कटिक बाथ' मंगळवारपासून लोकांसाठी खुले करण्यात आले. 2 / 13या ठिकाणी लाकडांपासून बनविलेला तरंगणारा रस्ता आणि बोटीच्या माध्यमातून जाता येते. विमानतळावरून जाण्यासाठी कार, हेलिकॉप्टरचाही वापर करता येतो. 3 / 13या हॉटेलमध्ये केवळ 12 खोल्या आहेत. हे हॉटेल बांधण्याची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली होती. 4 / 13आर्किटेक्ट बर्टिल हैरस्ट्रॉम आणि जोहान कोप्पी यांनी या हॉटेलचे डिझाईन केले आहे. 5 / 13. हे हॉटेल बनविताना नैसर्गिक वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 6 / 13हे हॉटेल सुरू होण्याआधीच लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे. 2020 आणि 2021 साठीचे बुकिंग आधीच सुरू करण्यात आले आहेत. 7 / 13या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे 815 पाऊंड म्हणजेच 75 हजार रुपये आहे. 8 / 13खास बाब म्हणजे हे हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीच्या पाण्यावर तरंगत राहणार आहे. तर थंडीमध्ये बर्फ जमल्यामुळे एकाच जागी असणार आहे. 9 / 13ल्युलिया विमानतळापासून हे हॉटेल केवळ सव्वा तासाच्या अंतरावर आहे. द आर्कटिक बाथच्या स्पा सेंटरमध्ये वेलनेस थीमवर काम करण्यात आले आहे. येथे ग्राहकांना न्यूट्रिशन, व्यायाम आणि मनाच्या शांतीसाठी मेडिटेशन थेरेपी देण्यात येते. 10 / 13या ठिकाणी आजुबाजुच्या प्रदेशात ध्रुवीय प्रदेशातील अस्वल पहायला मिळणार आहे. हॉर्स रायडिंग आणि नॅचरल फोटोग्राफीचा आनंदही घेता येणार आहे. 11 / 13येथून नॉर्थर्न लाइट्सचा नजाराही पाहता येणार आहे. 12 / 13पृथ्वीचा उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर हा प्रकाश दिसतो. उत्तर ध्रुवावर हवेमध्ये गॅसचे कण फिरत असतात. येथे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. जेव्हा या कणांवर अर्ध्यारात्री सूर्याची किरणे पडतात तेव्हा आकाशात रंगबेरंगी लाईट दिसू लागतात.13 / 13याचा आकार 20 किमी ते 640 किमी एवढा प्रचंड असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications