Mahashivratri 2021: Mahashivratri festival haridwar to kashi kumbh mela shahi snan temple pray
Mahashivratri 2021: महाशिवरात्रीला हरिद्वारपासून काशीपर्यंत बम-बम भोलेचा जयघोष; पाहा तीर्थस्थळांचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 11:19 AM1 / 7महाशिवरात्रीच्या ( Mahashivratri ) दिवशी हरिद्वारपासून काशीपर्यंत भक्तजनांचा उत्साह पाहायला मिळत आहे. हरिद्वारामध्ये आज महाकुंभाचे पहिले शाही स्नान आहे. जूना आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा आणि किन्नर आखाडा जवळपास ११ वाजता पौडी ब्रम्हकुंडावर स्नान करण्यासाठी पोहोचणार होते.2 / 7काशीमध्ये भोलेनाथांचे दर्शन करण्यासाठी सकाळपासून काशी विश्वनाथांच्या मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांमध्ये खूप उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी पाहता प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्थाही केली आहे. 3 / 7याव्यतिरिक्त देशात अनेक भागांमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता विशेष काळजी घेतली जात आहे. अनेक मंदिरांमध्ये रात्रीचा रुद्राभिषेक सुरू झालेला पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मिरवणूक काढली गेली नाही.4 / 7दिल्लीतील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिरात भक्तांची रांग पाहायला मिळाली. शिवलिंगावर अभिषेक करून लोक आशिर्वाद घेत आहेत. आंध्रप्रदेशातील चित्तूरमधील श्रीकालहस्ती स्वामींनी लोकांना दर्शन दिले आणि महाशिवरात्रीच्या वार्षिक ब्रम्होत्सवा दरम्यान वाहनांसह मिरवणूकीत सहभागी झाले. 5 / 7. महाराष्ट्रातील दक्षिण काशीच्या मंदिरातही लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली. उज्जैन महाकाल मंदिरात ब्राम्हण भगवान शिवाला अभिषेक करताना दिसून आहे. 6 / 7हरिद्वारमध्ये नागा साधुचे शाही स्नानसाठी आगमन झालेले पाहता सकाळी ७ वाजेपर्यंतच सामान्य भक्तांना अंघोळीची परवानगी दिली होती. 7 / 7हरिद्वारमध्ये महाकुंभांचे शाही स्नान पाहता सुरक्षेची व्यवस्था केली गेली आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित केल्यानंतर संपूर्ण परिसरात ३ सुपर जोन, ९ इतर जोन आणि २५ सेक्टरमध्ये पोलिसांची रवानगी करण्यात आली होती. सुरक्षा व्यवस्थामध्ये पोलिस अधिक्षक आणि सेक्टर्समध्ये पोलिस उपअक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications