Make the most of the Makar Sankranti long weekend at these 5 beautiful places in India!
मकर संक्रांतीनिमित्त भारतातील 'या' 5 सुंदर ठिकाणी घ्या लाँग वीकेंडचा पुरेपूर आनंद! By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 5:13 PM1 / 6मकर संक्रांतीचा सण जवळ येत असून यंदा तो 15 जानेवारीला आहे. बर्याच लोकांसाठी या सणासोबत लाँग वीकेंडचा आनंद घेण्याची संधी आहे. जर तुम्ही या वीकेंडला प्रवास करण्याचा विचार करत असाल तर दक्षिण भारतातील काही सुंदर ठिकाणं तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतात. ही ठिकाणं केवळ सुंदरच नाहीत तर मकर संक्रांतीच्या स्थानिक चालीरीतीही येथे अनुभवता येतील.2 / 6कर्नाटकमध्ये डोंगरांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्गमध्ये घनदाट जंगल, कॉफीचे मळे आणि हिरवेगार मैदान यांचे सुंदर दृश्य आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि वाइल्डलाइफ सफारीचा आनंद घेऊ शकता. मकर संक्रांतीच्यावेळी येथे पोंगल हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. स्थानिक लोक रंगीबेरंगी कपडे घालतात, पारंपारिक नृत्य करतात.3 / 6हम्पी हे विजयनगर साम्राज्याचे अवशेष असलेले कर्नाटकमधील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. येथे तुम्ही प्रचंड मंदिरे, अवशेष आणि प्राचीन कलाकृती पाहू शकता. मकर संक्रांतीच्यावेळी हंपीमध्ये 'हंपी उत्सव' आयोजित केला जातो, ज्यामध्ये नृत्य, संगीत आणि कला कार्यक्रम आयोजित केले जातात.4 / 6कोवलम हा केरळमधील समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेला एक उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही वाळू, निळे पाणी आणि नारळाच्या झाडांमध्ये आरामात वेळ घालवू शकता. मकर संक्रांतीदरम्यान कोवलममध्ये 'विशू' हा सण साजरा केला जातो, ज्यामध्ये लोक नवीन कपडे घालतात, मंदिरांना भेट देतात आणि पारंपारिक जेवणाचा आनंद घेतात.5 / 6केरळमधील मुन्नार आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला हिरवेगार पर्वत, चहाच्या बागा आणि धबधब्यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. मकर संक्रांतीच्यावेळी मुन्नारमध्ये 'ओणम' हा सण साजरा केला जातो, ज्यामध्ये लोक आपली घरे रंगीबेरंगी फुलांनी सजवतात, पारंपारिक नृत्य करतात.6 / 6केरळमधील 'व्हेनिस ऑफ बॅकवॉटर' म्हणून ओळखले जाणारे अलाप्पुझा हे मकर संक्रांती दरम्यान एक शानदार ठिकाण आहे. येथे हाउसबोटमध्ये राहून तुम्ही केरळच्या सुंदर बॅकवॉटरचा आनंद घेऊ शकता. स्थानिक गावांना भेट द्या आणि केरळच्या पारंपारिक पाककृतीचा आस्वाद घ्या. मकर संक्रांतीदरम्यान येथील मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते आणि बोटीतून मिरवणूक काढली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications