most beautiful botanical gardens in the world watch the beautiful botanical gardens of the world
ही आहेत जगातील सर्वाधिक सुंदर बोटॅनिकल गार्डन By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 3:09 PM1 / 41.रॉयल बोटॅनिकल गार्डन : इंग्लंडमधील रॉय बोटॅनिकल गार्डन जगातील सर्वात मोठे गार्डन आहे. जेथे मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या वनस्पती आहेत. 1840 साली हे गार्डन बांधण्यात आले होते. येथे जवळपास 30 हजार वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती आहेत. 2 / 42. ब्रुकलिन बोटॅनिकल गार्डन :न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन बोटॅनिकल गार्डन हे 52 एकर क्षेत्रावर पसरलेलं आहे. प्रॉसपेक्ट पार्कजवळ हे गार्डन आहे. 1910 साली या गार्डनची निर्मित करण्यात आली होती. या गार्डनची भ्रमंती करण्यासाठी प्रत्येक वर्षी जवळपास 9 लाख पर्यटक येतात, अशी माहिती आहे. या गार्डनमध्ये 200 चेरीची झाडं आणि 42 वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती आहेत. 3 / 43. सिंगापूर ट्रॉपिकल गार्डन : या गार्डनमध्ये ऑर्किड फुलाच्या जवळपास 20 हजार प्रजाती आहेत. हे गार्डन सिंगापूरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. 4 / 44. ब्राझीलच्या Corcovadoच्या पर्वतांच्या पायथ्याशी असलेले हे बोटॅनिकल गार्डन जगातील सर्वात सुंदर गार्डन आहे. 140 हेक्टरवर पसरलेल्या या गार्डनमध्ये जवळपास 6,500 वनस्पती आहेत. 1808 साली हे गार्डन बांधण्यात आले होते. मात्र, 1822 साली या गार्डनचे लोकार्पण करण्यात आले. आणखी वाचा Subscribe to Notifications