ही आहे भारतातील सर्वात स्वच्छ नदी, काचेसारखं पारदर्शक आहे इथलं पाणी By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:13 PM
1 / 6 वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांचे होणारे प्रदूषण ही भारतामधील गंभीर बाब बनली आहे. मात्र आजही देशात एक अशी नदी आहे जी अद्यापतरी प्रदूषणापासून दूर आहे. तसेच या नदीतील पाणी काचेसारखे पारदर्शक आहे. 2 / 6 उमगोट असे या नदीचे नाव असून, ती मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँगपासून 95 किमी अंतरावर आहे. 3 / 6 या नदीतील पाणी एवढे स्वच्छ आहे की त्यामध्ये धुळीचा एकही कण दिसून येत नाही. तसेच पारदर्शक पाण्यामुळे नदीचा तळही स्पष्टपणे नजरेस पडतो. 4 / 6 काचेसारख्या पारदर्शक स्वच्छ पाण्यामुळे या नदीमधून होडीतून प्रवास करताना आपण काचेवरूनच जातोय की काय असा भास होतो. 5 / 6 भारत आणि बांगलादेश अशा दोन देशातून वाहणाऱ्या या नदीच्या आसपासचा परिसरही निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. 6 / 6 या सुंदर नदीवर ब्रिटिशांनी एक पूल उभारला होता. मात्र आजही इथे येणाऱ्या पर्यटकांना नदीमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता पसरवू नये अशी सक्त ताकीद दिली जाते. आणखी वाचा