शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील 'ही' ठिकाणं सर्वात धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 3:49 PM

1 / 5
हवाई: हनीमूनला जाणाऱ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन अशी हवाईची ओळख आहे. मात्र ज्वालामुखीचे उद्रेक, विषारी वायू आणि भूकंपाचा धोका यामुळे हवाई जगातील धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे.
2 / 5
इस्रायल आणि मध्य आशिया: अमेरिकेनं आपला दूतावास जेरुसलेमला हलवल्यानं या भागात अशांतता आहे. इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधील हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे या भागात कायम हिंसक कारवाया सुरू असतात.
3 / 5
ब्राझील: काही महिन्यांपूर्वी एका संकेतस्थळाकडून जगातील सर्वात धोकादायक शहरांची यादी तयार करण्यात आली होती. यातील पहिल्या 50 शहरांपैकी 17 शहरं ब्राझीलमधील होती. बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं या देशात गुन्हेगारीची समस्या मोठी आहे.
4 / 5
मादागास्कर: या भागात राजकीय अस्थिरता असल्यानं बेरोजगारीची समस्या अतिशय मोठी आहे. त्यामुळे अधिक लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.
5 / 5
कैरो, इजिप्त: थॉम्सन रॉयटर्स फाऊंडेशननं केलेल्या सर्वेक्षणातून कैरो हे जगातील महिलांसाठीचं सर्वात धोकादायक असल्याचं समोर आलं. कैरोत दररोज लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात. त्यामुळे इजिप्तची राजधानी असलेलं कैरो स्थानिक आणि पर्यटक अशा दोघांसाठी धोकादायक आहे.
टॅग्स :tourismपर्यटन