Murmansk The Sunless City Where The Sun Does Not Rise For 40 Days
Sunless City एक असं शहर जिथे लागोपाठ ४० दिवस उगवत नाही सूर्य! By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 3:37 PM1 / 7नाइट शिफ्ट करणाऱ्यांची लाइफ इतरांपेक्षा वेगळी असते. जेव्हा सगळी दुनिया झोपत असते, तेव्हा ते जागत असता. बरं या लोकांना नाइट शिफ्ट करताना बघणं एका वेळेला सामान्य बाब आहे. पण जगात एक अशी जागा आहे जिथे मुलं रात्री शाळेत जातात. (Image Credit : www.rbth.com)2 / 7या अनोख्या शहराचं नाव आहे Murmansk, हे शहर रशियामध्ये आहे. येथील लोक वर्षातील तब्बल ४० दिवस सूर्य बघत नाहीत. चला जाणून घेऊ जगात Sunless City नावाने प्रसिद्ध असलेल्या या शहराबाबत. (Image Credit : www.rbth.com)3 / 7Murmansk हे शहर रशियातील एक प्रमुख बंदर आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान हे शहर वसवण्यात आलं होतं. हे शहर आर्कटिक सर्कलमध्ये येतं. त्यामुळे इथे थंडी प्रमाणापेक्षा जास्त असेत. फोटोग्राफर Sergey Ermokhin ने या अनोख्या शहराच्या वातावरणाचे आणि येथील लोकांच्या दिनक्रमाचे काही फोटो कॅमेरात कैद केले आहेत. (Image Credit : www.rbth.com) 4 / 7इथे गरमीच्या दिवसातही पूर्ण ६० दिवसांपर्यंत रात्र होत नाही आणि हिवाळ्यात ४० दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. अशाप्रकारच्या वातावरणात इथे साधारण ३ लाख लोक राहतात. असेही नाही की, हे शहर रशियापासून पूर्णपणे वेगळे आहे. इथे वाहतूकीसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटकही इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. (Image Credit : www.rbth.com)5 / 7इथल्या वातावरणाला पोलर दिवस आणि पोलर रात्र असं वाटण्यात आलं आहे. २२ मे ते २२ जुलै इथे दिवस उगवत नाही. या स्थितीला पोलर दिवस म्हटलं जातं. यादरम्यान इथले लोक हेही विसरुन जातात की, दिवस कधी झाला आणि रात्र कधी झाली. या लोकांनी इथल्या वातावरणानुसार स्वत:ला सवयी पाडल्या आहेत. पण पर्यटकांना याचा फार त्रास होतो. (Image Credit : www.rbth.com)6 / 7त्यानंतर येते ती रात्र, ज्या रात्रीची सकाळ होत नाही. २ डिसेंबर ते ११ जानेवारीपर्यंत. पोलर रात्र असताना लोक रात्रीच आपापली कामे करत असतात. लहान मुले रात्रीच शाळेत जातात. हिवाळ्यात या ठिकाणाचं तापमान -३४ डिग्री इतकं असतं. (Image Credit : www.rbth.com)7 / 7या वातावरणात जेव्हा सूर्य पहिल्यांदा केवळ ३४ मिनिटांसाठी उगवतो. अशाप्रकारे हळूहळू दिवसांचे तास वाढत जातात. सूर्य उगवल्यावर येथील लोक जल्लोष करतात. डॉक्टर सांगतात की, भलेही या लोकांच्या शरीराला या गोष्टींची सवय झाली असेल. पण त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सूर्यापासून मिळणारं व्हिटॅमिन डी आणि अल्ट्रावायलेट किरणांच्या अभावामुळे ते आजारी पडू शकतात. (Image Credit : www.rbth.com) आणखी वाचा Subscribe to Notifications