शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॅरिस, स्वित्झर्लंड सोडा, भारतातली ही ठिकाणं नक्की पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 2:44 PM

1 / 5
भारतात बर्फाच्छादित असलेले डोंगर आणि सुंदर इमारती नेहमीच पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतात. भारतातल्या काश्मीरपासून केरळपर्यंतच्या राज्यांना निसर्गाचं वरदान लाभलं आहे. श्रीनगरमधलं डल लेकजवळच्या कोणत्याही हॉटेलमध्ये थांबल्यास आपल्याला मनसोक्त फिरायला मिळतं. इथल्या हाऊसबोट्स वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असून, याचं भाडं एखाद्या लग्झरी हॉटेलपेक्षाही महाग आहे.
2 / 5
उत्तर प्रदेशातील आग्र्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल स्वतःच्या जोडीदाराबरोबर पाहण्यात एक वेगळीच मजा असते.
3 / 5
हिवाळ्यात फिरण्यासारखी शिमल्यातही अनेक ठिकाणं आहेत. इथे मोठं कॅफे आणि रेस्टॉरंट आहेत. तसेच निसर्गाचं अलौकिक सौंदर्य इथे पाहायला मिळते.
4 / 5
केरळमधली मुन्नारमधले चहाच्या मळ्यातून फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. चहाच्या मळ्यातून चढणं-उतरणं आणि त्यातच जंगलाची सफर ही भारीच असते. इथे आल्यावर आपल्याला ताजंतवानं व्हायला होतं.
5 / 5
अष्टमुदी लेक आणि अरबी समुद्रामध्ये कोल्लम बॅकवॉटर्स आहे. या बॅकवॉटर्सची सैर आयुष्यात एकदा तरी नक्कीच करावी.
टॅग्स :Keralaकेरळtourismपर्यटनWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिन