- अमृता कदम‘पाऊस कोसळतोय, वाटा काहीशा निसरड्या आहेत पण तरीही डोंगरमाथ्यावर पोहचायचंच आहे’. पावसाळ्यात करणाऱ्यांचा हा नेहेमीचा अनुभव. पावसाळातल्या ट्रेकिंगमध्ये असलेलं थ्रील अनुभवण्यासाठी अनेक हौशी लोक पाऊस पडू लागला की ट्रेकिंगसाठीच्या जागा शोधात. खरंतर अनेकांना पावसाळी टे्रकिंगला जावसं वाटतं पण मनात धाकधूक असते, यातले बारकावे माहित नसतात आणि नुसत्या आवडीवर कोणी साहस करायला धजावत नाही. पण असं असलं तरी ज्यांना मनापासून पावसाळी ट्रेकिंगला जायचंय त्यांनी छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्या. काळजी घेवून ट्रेकिंग केलं तर पावसाळी ट्रेकिंग हा अविस्मरणीय अनुभव ठरतो. पावसाळी ट्रेकला जा पण एवढी काळजी घ्या..1. ट्रेकला सूट होणारे बूटजेव्हा ट्रेकिंग शूजच्या खरेदीला जाल तेव्हा उत्तम क्वालिटीसोबतच आरामाचाही विचार करा. तुमच्या नेहमीच्या साइजपेक्षा एक साइज मोठे लाइटवेट शूज हा ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे. हलक्या वजनामुळे हे शूज चिखलामध्ये रूतत नाहीत. त्यामुळे चालताना त्रास होत नाही. बऱ्याचदा ट्रेकिंग करताना पायांना हलकीशी सूज येते. अशावेळी जर शूज एक साइज मोठा असेल तर पायांना त्रास होत नाही. शूज घेताना उत्तम ग्रिप असलेल्या घोट्यापर्यंत योग्य उंची असलेल्या शूजमधून निवड केली तर फारच चांगलं! कारण पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. पाय हलकासा मुरगळला तरी त्रास होऊ शकतो. म्हणूनच शूजची हाइट विचारात घेणं आवश्यक आहे. या सगळ्या वैशिष्ट्यांसोबतच शूज वॉटरप्रूफ तर असलेच पाहिजेत कारण ही पावसाळ्यातली भटकंती आहे. 2.लाइटवेट वॉटरप्रूफ बॅकपॅक आणि पोंचोमान्सून ट्रेकला जाताना अनेकांकडून होणारी चूक म्हणजे ट्रेकच्या वेळी वजनदार अशा बॅकपॅकचं ओझं बाळगलं जातं. त्यामुळे चढाईच्या वेळेस तर त्रास होतोच पण तुमच्या पाठीचेही हाल होतात. तुमचं हे ओझं लाइटवेट वॉटरप्रूफ बॅगपॅक नक्कीच हलकं करेल. या बॅगेत एक हलका पोंचो किंवा रेनकोट टाकून ठेवा. कारण तुमच्या कपड्यांच्या लिमिटेड सेटमध्ये न भिजता रहायचं असेल तर रेनकोट मस्ट आहे. बॅगेत प्लास्टिकच्या चार पाच पिशव्याही ठेवा. म्हणजे ओले कपडे किंवा सामान वेगळं ठेवता येऊ शकेल. पावसाळी ट्रेकला जाताना कॉटनचे कपडे टाळा. कारण ते सुकायला वेळ घेतात.3. पावसाळी ट्रेकला सनग्लासेस मस्टसनग्लासेस ही उन्हाळ्यातली ट्रॅव्हल एक्सेसरी आहे, असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. पावसाळी ट्रेकसाठीही सनग्लासेस गरजेचे आहेत. विशेषत: जेव्हा तुम्ही पर्वतरांगांमध्ये अतिशय उंचावर असाल. पावसाळ्यात आकाश निरभ्र झाल्यानंतरचा सूर्यप्रकाश डोळ्यांना टोचतो आणि त्याची परिणती डोळ्यांतून पाणी येणं, डोकदुखी यामध्ये होते. म्हणूनच आपल्या ट्रेकसाठीच्या सामानामध्ये सनग्लासेस ठेवायला विसरु नका. 4.फ्लिप-फ्लॉप्सतुमच्या बॅगपॅकमधली अजून एक आवश्यक गोष्ट म्हणजे फ्लिप-फ्लॉपचा जोड. ट्रेकिंगदरम्यान तुम्ही मुक्काम करणार असाल तर तुमच्या पायांना फ्लिप-फ्लॉपमुळे आराम मिळेल. या बऱ्याचशा चप्पल वॉटरप्रूफ असल्यामुळे तुम्ही त्या घालून इकडे-तिकडे फिरूही शकता.5.अँटी-फंगल क्रीमपावसाळ्यामधलं दमट हवामान हे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीसाठी पोषक असतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स ही अगदी कॉमन गोष्ट असते. फंगल इन्फेक्शन्समुळे सूज येणं, खाज सुटणं असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे सामानामध्ये आठवणीनं अँटी-फंगल क्रीम ठेवावी.6. आठवणीनं मीठ घ्या !हो...मीठच! पॅकिंमधली ही बारकाईनं लक्षात ठेवायची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगमधल्या अडनिड्या वाटांवर तुम्हाला जळवांचा सामनाही करायला लागू शकतो. पायावर चढणाऱ्या या रक्तशोषक जळवांना दूर करण्यासाठीचं सहज साधन म्हणजे मीठ. मीठासोबतच लिंबाचा रस बरोबर ठेवू शकला तर खूपच चांगलं. पावसाळी ट्रेक म्हणजे धम्माल मस्ती आणि थ्रील. मात्र ते अनुभवायचं असेल, तर तुमची तयारी नीट झाली पाहिजे. म्हणूनच या टिप्स लक्षात ठेवा आणि तुमचा मॉन्सून ट्रेक एन्जॉय करा.