secret of unnakoti temple yet to get revealed even scientists are clueless
सर्वात रहस्यमय मंदिरांमध्ये 'या' मंदिराचा समावेश, १ कोटी मुर्त्यांपैकी एक कमी का? घ्या जाणून By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:58 PM1 / 10भारतात अशी अनेक रहस्यमय मंदिरे आहेत ज्यांचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. एक मंदिर आहे जिथे एकूण ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्ती आहेत.2 / 10या मंदिराचे गूढ उकलण्यासाठी अनेक विद्वानांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. एक कोटीमध्ये एक कमी मूर्ती का बनवली गेली हे सर्वात मोठे गूढ आहे. या मूर्तींबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात.3 / 10या मंदिराबद्दल असे मानले जाते की, एकदा भगवान शिव एक कोटी देवतांसह कुठेतरी जात होते. सर्व देवता झोपी गेल्या. सकाळी भगवान शिव उठले, तेव्हा सर्व देवता झोपलेले होते. 4 / 10शिवजींना राग आला आणि त्यांनी शाप दिला आणि सर्व देवता दगड झाले. यामुळेच ९९ लाख ९९ हजार ९९९ मूर्ती आहेत.5 / 10या मूर्तींबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. कालू नावाचा एक कारागीर होता असे म्हणतात. त्याला भगवान शंकर आणि माता पार्वतींसोबत कैलास पर्वतावर जायचे होते.6 / 10पण ते अशक्य होते. कारागिराच्या आग्रहास्तव भगवान शंकर म्हणाले की, तुम्ही एका रात्रीत एक कोटी देवी-देवतांच्या मूर्ती बनवल्या तर ते तुम्हाला सोबत घेऊन जातील.7 / 10यानंतर कारागिरांनी रात्रभर उपाशी राहून मूर्त्या तयार केल्या, मात्र एक कोटीतील एक मूर्ती कमी राहिली. त्यामुळे भगवान शंकराने कारागिराला सोबत घेतले नाही. 8 / 10त्यामुळेच या ठिकाणाचे नाव उनाकोटी पडल्याचे सांगितले जाते.9 / 10उनाकोटी मंदिर हे त्रिपुराची राजधानी आगरतळा पासून 145 किमी अंतरावर आहे. भारतातील सर्वात मोठ्या रहस्यमय मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो.10 / 10या मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी येथे येणाऱ्या भाविकांच्या मनात उत्सुकता असतेच. त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी आणखी वाचा Subscribe to Notifications