See restaurants over 100 years old in India most-popular old restaurants know more
पाहा भारतातील १०० वर्षांपेक्षा जुनी रेस्तराँ; खाण्याचा आनंद घेण्यासह इतिहासही जाणून घेण्यासाठी येतात पर्यटक By जयदीप दाभोळकर | Published: October 04, 2021 4:04 PM1 / 6प्रत्येक ठिकाणाचा स्वतःचा इतिहास असतो, ज्यामुळे ही ठिकाणे आणखी खास बनतात. काही रेस्तराँ अशीही आहेत जे खाद्यप्रेमींना भूरळही घालतात, पण त्यांचा एक ऐतिहासिक वारसाही आहे. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांसाठी, विशिष्ठ वास्तूंसाठी आणि त्यांच्या इंटिरिअरमुळे पर्यटकांना आकर्षित करत असतात. 2 / 6भारतात काही रेस्तराँ आहेत, जे त्यांच्या खाद्यपदार्थांसाठीच नव्हे तर त्यांच्या ऐतिहासिक वारस्यामुळे खूप प्रसिद्ध आहेत. ही रेस्तराँ १०० वर्षांहून अधिक जुनी आहेत. जर तुम्ही खाद्यप्रेमी असाल किंवा एखाद्या अनोख्या अनुभवाचा आनंद घेऊ इच्छित असाल तर इथे एकदा नक्की भेट द्या.3 / 6ग्लेनरीस, दार्जिलिंग दार्जिलिंगच्या डोंगराळ शहरातील सर्वात जुन्या रेस्तराँपैकी एक असलेलं ग्लेनरीस १३० वर्षांपेक्षा जुने आहे. जबरदस्त लंच आणि डिनरसाठी फक्त एकच जागा नाही, तर ग्लेनरीमध्ये एक बेकरी देखील आहे जी तुम्हाला स्वादिष्ट पदार्थांचं वेड लावेल. हे रेस्तराँ नेहरू रोडवर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बसून डोंगरांचाही आणि निसर्गाचाही आनंद घेता येतो.4 / 6लियोपोल्ड कॅफे, मुंबई मुंबईचे हे प्रसिद्ध रेस्तराँ आणि बार १५० वर्षे जुने आहे. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही या रेस्तराँला लक्ष्य करण्यात आले होते. येथे अजूनही या हल्ल्यात झालेल्या गोळीबाराच्या खुणा दिसतात. हे ठिकाण केवळ पर्यटकांमध्येच नाही तर स्थानिक लोकांमध्येही खूप लोकप्रिय आहे.5 / 6इंडियन कॉफी हाउस, कोलकाता देशातील भारतीय कॉफी हाऊसची सर्वात लोकप्रिय ब्रान्च म्हणजे इंडियन कॉफी हाऊस. यापूर्वी याचं नाव अल्बर्ट हाऊस असं होतं. पण १९४७ मध्ये त्याचं नाव बदलून कॉफी हाऊस करण्यात आलं. १८७६ मध्ये सुरू झालेल्या या कॉफी हाऊसच्या काही प्रसिद्ध संरक्षकांमध्ये सत्यजित रे, मृणाल सेन, अमेरिकन कवी अॅलन गिन्सबर्ग यांचा समावेश आहे.6 / 6टुंडे कबाब ११५ वर्ष जुनी असलेली ही जागा भारतात कबाब प्रेमींसाठी आवडतं ठिकाण आहे. जर तुम्ही कबाब प्रेमी असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. १९०५ मध्ये याची सुरूवात करण्यात आली होती. या ठिकाणी कबाब तयार करण्यासाठी जवळपास १२५ सामग्रींचा वापर केला जात असल्याचं म्हटलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications