See Saif Ali Khan's Pataudi Palace special photo
पाहा सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसचे खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 4:23 PM1 / 81935 मध्ये पतौडी पॅलेसचं निर्माण करण्यात आलं होतं. हे पॅलेस 8वे नवाब आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी तयार बनवले होते.2 / 8इफ्तिखाल अली यांचा मुलगा मंसूर अली म्हणजेच नवाब पतौडी यांनी परदेशातून आर्किटेक्ट बोलवून या पॅलेसचं रिनोव्हेशन केलं होतं. 3 / 8पतौडी पॅलेस लोकप्रिय जागांपैकी एक मानलं जातं. कारण या पॅलेसची किंमत जवळपास 800 कोटी रुपये सांगितली जाते. पण या पॅलेसला हेरिटेज हॉटेल करण्यात आलं आहे. 4 / 8या पॅलेसमध्ये एकूण 150 खोल्या आहेत. या पॅलेसमध्ये काम करण्यासाठी 100 पेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवण्यात आले होते. 5 / 8या पॅलेसमध्ये अनेक मोठी मैदाने आणि गॅरेज आहेत. इतकेच नाहीतर घोड्यांसाठी इथे एक अस्तबलही आहे. काही दिवसांपूर्वीच इथे काढलेला सैफ अली खानचा आणि तैमुरचा फोटो समोर आला होता. 6 / 8एक मोठी बाब म्हणजे दिल्लीच्या कॅनॉट प्लेसला डिझाईन करणारे रॉबर्ट टोर रसेल यांनीच पतौडी पॅलेसचं डिझाईन तयार केलं होतं. 7 / 8या खानदानी पॅलेसमध्ये सैफच्या दादीची एक शानदार फायप्लेस आणि लायब्ररी आहे. ही लायब्ररी सैफने नव्याने डिझाईन केली आहे. 8 / 8पतौडी पॅलेसचं रिनोव्हेशन सैफ अली खानने केलं होतं. या पॅलेसमध्ये एक मोठं ड्राईंग रुम, 7 बेडरुम आणि बिलियर्स रुमही आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications