See stunning pictures of national war memorial of India
राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या काही खास गोष्टी जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 3:06 PM1 / 12भारतातील पहिलं वॉर मेमोरिअल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार झालं असून इंडिया गेटजवळील या वॉर मेमोरिअलमध्ये देशातील तिन्ही सेनेच्या शहीदांचे नाव लिहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारीला याचं उद्घाटन केलं होतं. यावेळी तिन्ही दलाचे प्रमुख इथे उपस्थित होते. या ऐतिहासिक स्मारकाचे फोटोही समोर आले आहेत. चला बघुया काही फोटो...2 / 12नॅशनल वॉर मेमोरिअलमध्ये देशासाठी शहीद झालेल्या २६००० सैनिकांची नावे लिहिण्यात आली आहेत. यांनी युद्ध आणि वेगवेगळ्या कारवायांमध्ये देशासाठी आपला जीव गमावला होता. 3 / 12इंडिया गेटजवळ असलेलं स्मारक साधारण ४० एकर परिसरात तयार करण्यात आलं आहे. या स्मारकाचा काही भाग अंडरग्रांऊड आहे.4 / 12हे स्मारक तयार करण्यासाठी २२ झाडे तोडली गेली. तर त्या बदल्यात ७१५ झाडे लावण्यात आली.5 / 12हे स्मारक तयार करण्यासाठी २२ झाडे तोडली गेली. तर त्या बदल्यात ७१५ झाडे लावण्यात आली.6 / 12हे स्मारक तयार करण्यासाठी जवळपास १७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.7 / 12परमवीर चक्र मिळालेल्या शहिदांची नावे हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिण्यात आली आहेत. 8 / 12या स्मारकातील प्रतिमा आणि परिसर थंड व हिरवा ठेवण्यासाठी इथे १४ लाख लिटरचं एक अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीम तयार केली आहे.9 / 12भींतींवर ग्रेनाइटच्या दगडांवर शहिदांची नावे, रॅंक आणि रेजिमेंटचा उल्लेख आहे. यात भारतीय लष्करातील २५, ५३९, नौसेनेच्या २३९ आणि वायूसेनेच्या १६४ शहिदांची नावे आहेत. 10 / 12तसेच इथे परमवीर चक्र मिळालेल्या२१ जवानांच्या कास्यांच्या प्रतिमा आहेत.11 / 12तसेच इथे परमवीर चक्र मिळालेल्या२१ जवानांच्या कास्यांच्या प्रतिमा आहेत.12 / 12तसेच इथे परमवीर चक्र मिळालेल्या२१ जवानांच्या कास्यांच्या प्रतिमा आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications