शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मनाला सुखावणारी आणि खिशाला परवडणारी देशातली 6 पर्यटनस्थळं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 4:02 PM

1 / 6
अंदमान आणि निकोबार: नितांत सुंदर समुद्र किनारे हे अंदमान आणि निकोबारचं वैशिष्ट्य. ऑगस्ट महिना अंदमान आणि निकोबार फिरण्यासाठी सर्वोत्तम कालावधी समजला जातो.
2 / 6
गोवा : देशासह परदेशातील पर्यटकांसाठी गोवा हे कायमच ऑल टाईम हॉट फेव्हरिट डेस्टिनेशन राहिलंय. समुद्र किनारे, गड-किल्ले, चर्च हे गोव्याचं वैशिष्ट्य आहे.
3 / 6
हम्पी : हनुमानाचं जन्मस्थळ अशी श्रद्धा असणाऱ्या हम्पीला युनेस्कोनं जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी पाहायला मिळतात.
4 / 6
काश्मीर : भूतलावरील स्वर्ग अशी ओळख असणारं काश्मीर पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातल्या महत्त्वपूर्ण ठिकाणांपैकी एक आहे. फेब्रुवारी महिन्यात काश्मीरमधलं वातावरण पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वाधिक अनुकूल असतं.
5 / 6
लेह : साहसी वृत्ती असलेल्यांना कायमच लेह खुणावतं. या भागात दुचाकी किंवा चारचाकी चालवणं आव्हानात्मक समजलं जातं. जून महिन्यात या ठिकाणची ट्रिप प्लान केल्यास ती अतिशय स्वस्तात होऊ शकते.
6 / 6
सिक्कीम : तिबेटियन आणि भारतीय जीवनशैलीचा उत्तम मिलाफ पाहण्यासाठी सिक्कीमला भेट द्यायलाच हवी. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या सिक्कीमला भेट देण्यासाठी फेब्रुवारीचा महिना उत्तम समजला जातो.
टॅग्स :tourismपर्यटनBudgetअर्थसंकल्प