शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील अशी काही रोमँटिक ठिकाणं, येथील क्षण अविस्मरणीय ठरतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 3:28 PM

1 / 7
पिंक सिटी जयपूरमधील सुजन राजमहल ही जागा सर्वात रोमँटिक असल्याचे म्हटले जाते.
2 / 7
उदयपूर येथील ओबेरॉय उदयविलास हे स्थळ लोकप्रिय आहे. याठिकाणी पर्यटक येतात.
3 / 7
अंदमान-निकोबार येथील जलाकरा हे बेट रोमान्स करण्यासाठी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
4 / 7
केरळमध्ये अनेक रोमँटिक ठिकाणं अतिशय सुंदर आहेत. येथील अॅलेपी खूप छान ठिकाण आहे. बॅकवॉटर, हाऊसबोट आणि कालव्यांमुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
5 / 7
उत्तराखंडमधील चमोलीमध्ये वसलेल्या ऑली या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यामध्ये नवदाम्पत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. स्किईंग करण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
6 / 7
जसलमेर या शहराला प्रचंड मोठा इतिहास आहे. शेकडो वर्षांच्या प्रथा-परंपरा या शहरानं आजही जपल्या आहेत. थार वाळवंटातील मुक्काम, उंटांवरील प्रवास, अनेक ऐतिहासिक आणि सुंदर राजवाडे यांच्यामुळे जसलमेर शहराला दिलेली भेट अविस्मरणीय ठरते.
7 / 7
आसाममध्ये असणारं हॅफलाँग हिल स्टेशन कपल्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे ठिकाण डोंगरांच्या कुशीत वसलेलं आहे.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स