Some special places that will be remembered in India!
भारतातील आठवणीत राहतील अशी काही खास ठिकाणं! By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 2:46 PM1 / 7भारत हा उंच डोंगरांगा, पर्वत-शिखरे, नद्या, बर्फाळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश अशा विविध भौगोलिक परिस्थितीने समृद्ध देश आहे. त्यामुळे भारताचे हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. अशाच काही पर्यटन स्थळांची माहिती आम्ही तुम्हाला देतोय...2 / 7ऋषीकेश : जगाची योग राजधानी म्हणून ऋषीकेशला ओळखले जाते. या ठिकाणी अनेक योगा स्कूल आहेत. आपली ऋषीकेशची ट्रिप योगाच्या दुनियेतील पहिले पाऊल असल्याची होईल.3 / 7वर्षा जंगल : वेस्टर्न घाटात असलेले कर्नाटकातील वर्षा जंगलात अनेक वन्यजीव आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी तुम्ही वालंटियर सुद्धा करू शकता. अगुम्बे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशनकडून वालंटियर्संना मिळते. तसेच, कमी पैशात याठिकाणी खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था आहे.4 / 7कलारीपयट्टू : कलारीपयट्टूला जगात 'मदर ऑफ मार्शल आर्ट्स' म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात जुने डिफेंस आर्टफॉर्म यापैकी कलारीपयट्टू एक आहे.5 / 7हंपी : हंपीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. येथील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन याठिकाणी येतात. इतकेच नाही तर येथील तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर सुद्धा तुम्हाला मजा येईल.6 / 7मधुबनी पेंटिंग : बिहारमधील मधुबनी आपल्या अद्धभूत पेंटिंग्ससाठी ओळखले जाते. याला मधुबनी पेंटिंग म्हणतात. पेंटिंग शिकण्यासाठी याठिकाणी अनेकजण येतात.7 / 7चीजमेकिंग : तुम्ही सतत स्वित्झलँड, फ्रान्स, स्पेन आणि इटलीमधील चीज बद्दल ऐकले असेल. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? काश्मीरची चीजमेकिंग जास्त प्रसिद्ध आहे. जर तुम्ही याठिकाणी चीजमेकिंग एकदा शिकला तर आयुष्यभर विसरणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications