Special luxury brand of Tejas Express
एक्सप्रेसचा लक्झरी ब्रँड, 'तेजस'ची खास सफर By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 2:57 PM1 / 7लखनौ येथून दिल्लीला जाणारी तेजस एक्सप्रेस शुक्रवारी 11.03 वाजता कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहचली. 2 / 7मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिरवा झेंडा दाखवून या एक्सप्रेसचा शुभारंभ केला. आयआरटीसीकडून या खासगी रेल्वेचं नियोजन करण्यात येतंय. 3 / 7या रेल्वेतील लक्झरीयस आणि आरामदायी प्रवासामुळे तेजस एक्सप्रेस चर्चेचा विषय ठरली आहे. 160 किमी प्रतीतास वेगाने ही रेल्वे धावते. रेल्वेच्या प्रत्येक सीटवरील पाठिमागील बाजूस एलईडीची व्यवस्था आहे. 4 / 7या सीटवरील प्रवाशांना गाणे ऐकणे, चित्रपट पाहणे किंवा गेम खेळण्याची मनोरंजनात्मक व्यवस्था आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना इअरफोनही देण्यात आले आहेत. 5 / 7या ट्रेनमध्ये वायफायसह कॅटरिंगचे मेन्यू नामांकित शेफद्वारे तयार केले जातात. शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत याचे तिकीट भाडे अधिक आहे.6 / 7 तेजस एक्सप्रेसमध्ये विमानातील प्रवाशांना मिळतात, तशाच सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 7 / 7तेजस एक्सप्रेसची सेवा 6 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे. पहिला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून जेवण आणि गिफ्टही देण्यात आलं. आणखी वाचा Subscribe to Notifications