1 / 9थायलंड- जर तुम्हाला समुद्र किनारे, डोंगरदऱ्या आवडत असतील, तर थायलंड हा उत्तम पर्याय असतो. आयफोन एक्स सीरिजमधील अनेक मोबाईल्सची किंमत 50 हजारांहून सुरू होते. इतक्या पैशात थायलंडमध्ये पर्यटनचा आनंद घेता येऊ शकतो. थायलंडमध्ये सहा दिवस, पाच रात्री असं पॅकेज घेतल्यास त्यासाठी साधारणत: 40 हजाराच्या आसपास खर्च होतील.2 / 9सिंगापूर- या देशात पाहण्यासारखं बरंच काही आहे. राष्ट्रीय संग्रहालय, समुद्राखालील अद्भुत दुनिया अशा अनेक ठिकाणांना भेटी देणं आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे. चार दिवस, तीन रात्रीचं हॉलिडे पॅकेज 45 हजारांच्या आसपास उपलब्ध आहे.3 / 9सेशेल्स- समुद्र किनारे, तिथली भटकंती आवडत असेल, तर सेशेल्सला नक्की भेट द्या. या ठिकाणचा खर्च 50 ते 60 हजारांच्या आसपास आहे. 4 / 9व्हिएतनाम- सोलो ट्रिपसाठी हा उत्तम पर्याय. हनोई, हा लाँग बे, हो ची मिन्ह सिटी या ठिकाणांना नक्की भेट देता येतील. सहा रात्री, पाच दिवसांच्या पॅकेजला 40 ते 45 हजारांचा खर्च येईल. 5 / 9श्रीलंका- आपल्या शेजारी असणाऱ्या या देशात पाहण्यासारखं खूप काही आहे. युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलेली अनेक ठिकाणं या देशात आहेत. पाच दिवस आणि चार रात्री अशी टूर प्लान करत असाल, तर त्यासाठी 40 हजारांचा खर्च येईल. 6 / 9नेपाळ- भारताच्या अगदी जवळ असणारा हा देश पर्यटनासाठी उत्तम पर्याय. नेपाळमध्ये सात रात्री आणि सहा दिवस घालवायचे असल्यास 30 हजार रुपये इतका खर्च येईल. 7 / 9भूतान- भारताचा शेजारी असलेल्या या देशाला निसर्गानं अगदी भरभरुन दिलं आहे. सहा दिवस, पाच रात्री असा प्लान अवघ्या 40 हजारात करता येईल.8 / 9लेबनॉन- सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या या देशात अनेक जागतिक वारसा स्थळं आहेत. पाच रात्र, सहा दिवस लेबनॉन फिरायचं असल्यास त्यासाठी 50 हजार खर्च येईल. 9 / 9चीन- चीन आता पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरू लागला आहे. पाच दिवस चीनमध्ये फिरायचं असेल, तर 45 हजार रुपये खर्च येईल.