शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातल्या 'या' मठांत मनःशांतीसाठी येतात पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 3:14 PM

1 / 6
कामाच्या व्यापात आणि धकाधकीच्या जीवनात कायम मनात काहूर माजलेलं असतं. अशातच आपल्याला एका शांत ठिकाणी जाण्याची नितांत आवश्यकता असते. भारतातही असे काही मठ आहेत ते आपल्याला आत्मशांती देतात.
2 / 6
हेमिस मोनेस्ट्री मठ हा लडाखमधला सर्वात मोठा मठ आहे. सुंदर पर्वतराजीत हा मठ स्थानापन्न आहे. बौद्ध धर्माला हा मठ वारशात मिळाला होता. या मठात भगवान बुद्धाची सुंदर प्रतिमा आहे.
3 / 6
जम्मू-काश्मीरमधल्या लेह लडाख हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दहशतवाद्यांच्या उपद्रवामुळे हे काश्मीर नेहमीच अशांत असतं. परंतु काश्मीरमधल्या मठांमध्ये आपल्याला मनःशांती मिळते.
4 / 6
थिकसे मोनेस्ट्री हा भारतातला दुसरा सुंदर मठ असून, तो लेहच्या पठारांमध्ये वसलेला आहे.
5 / 6
सिक्कीममधलं सर्वात सुंदर मठ म्हणझे रुमटेक मठ आहे. या मठातून विलोभनीय निसर्गाची प्रतिमा पाहायला मिळते. मठाच्या तिसऱ्या मजल्यावर वेगवेगळ्या पेंटिंग्ज आहेत. तसेच दुर्लक्ष बौद्ध कलाकृती आणि भगवान बुद्धाची 1001 सोन्याच्या आकर्षक वस्तू आहेत.
6 / 6
या मठाच्या आजूबाजूची इमारतींची व्यवस्था ही ग्रीनमधल्या पर्वतांवर असलेल्या इमारतींची आठवण करून देतात. या मठात 49 इंचाची बुद्धाची प्रतिमा आहे.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स