temple in Turkey is famous as Gate of Hell as people die after entering in temple
'हा' आहे नरकाचा दरवाजा, येथे गेलेला माणूस कधीही परत येत नाही कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 6:24 PM1 / 10हे मंदिर तुर्कीचे प्राचीन शहर हेरापोलिसमध्ये आहे. असं म्हणतात जो या मंदीराच्या प्रवेशद्वारातून आत जातो तो पुन्हा कधीच बाहेर येत नाही.2 / 10भयानक म्हणजे या मंदिरात त्या मृत्यू झालेल्या लोकांचा मृतदेहही सापडत नाही.3 / 10'सायन्स अलर्ट डॉट कॉम'नुसार मागील अनेक वर्षांत असे मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे या मंदिरात गेलेल्या पशुंचाही मृत्यू होत आहे.4 / 10या कारणामुळे हा नरकाचा दरवाजा म्हणून ओळखला जातो.5 / 10या मंदिराबाबत लोकांची अशी समजुत आहे की या मंदिरातील युनानी देवतेच्या विषारी श्वासांमुळे हे मृत्यू होत आहेत.6 / 10ग्रीक रोमन काळात याबाबत एक कायदा बनवण्यात आला होता की जो कुणी या मंदिरात जाईल त्याचे मुंडके उडवण्यात येईल.7 / 10पण वैज्ञानिकांनी या रहस्यमय मृत्यंचे रहस्य उलगडले आहे.8 / 10वैज्ञानिकांच्या मते या मंदिराच्या खाली मोठ्याप्रमाणात कार्बन डायोक्साईड आहे त्यामुळे माणसांचा, पशु-पक्ष्यांचा तिथे गेल्यावर मृत्यू होतो.9 / 10या गुहेमध्ये ९१ टक्के कार्बन डायोक्साईड आहे जो तीस मिनिटात माणसाला मृत्यूच्या दाढेत ढकलु शकतो. 10 / 10याच मंदिराच्या गुबेतून येणाऱ्या वाफेच्या संपर्कात आलेले पशुपक्षीही यामुळेच दगावतात. आणखी वाचा Subscribe to Notifications