These are the best places to enjoy a holiday in March
मार्चमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही ठिकाणं आहेत बेस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 9:35 PM1 / 6वेळास गाव, रत्नागिरी- कोकणातल्या रत्नागिरी वेळास गाव हे मत्स्यपालनासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून जवळपास 220 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे. या गावातील घरं पारंपरिक पद्धतीनं बांधण्यात आली आहेत. मार्च महिन्यात वेळास गावातील वातावरण थंड असते. 2 / 6गोवा - भारतातील पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून गोवा राज्य प्रसिद्ध आहे. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि आराम करण्यासाठी उपलब्ध असलेली भरपूर ठिकाणे पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. 3 / 6लक्षद्वीप हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मिनीकॅाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्या साठी प्रसिद्ध आहे. फॅास्फेट, कॅल्शीयम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत.4 / 6अंदमान- नीरव शांतता आणि स्वच्छ समुद्रकिनारे अंदमानमध्ये पाहायला मिळतात. समुद्रकिनारी सुट्टी घालवायची असेल तर पर्यटनाचे हे एक खास ठिकाण आहे. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. अंदमानचे समुद्रकिनारे काही खास गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे, पांढरीशुभ्र वाळू आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण आहे.5 / 6उटी- उटीमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळापैकी एक आहे. निसर्ग सौंदर्य, चहूबाजूंनी दाटलेली हिरवळ, देवदार वृक्षाने सजलेली वनराई पर्यटकांना नेहमीच आकर्षिक करतात. बॉटनिकल गार्डनही प्रसिद्ध आहे. या गार्डनमध्ये सौंदर्यासह बोटिंग, घोडेस्वारी हे प्रमुख आकर्षण आहे. उटी हे शहर निलगिरी पर्वतरांगेत सुमारे 7 हजार 350 फूट उंचीवर वसले आहे. 6 / 6कुर्ग- म्हैसूरहून 120 किमी दूर स्थित कुर्ग म्हणजेच कोडागू पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटकाच्या पश्चिम घाटात वसलेल्या या ठिकाण्यावर वातावरणात गारवा आहे. या शांत आणि थंडगार हिलस्टेशनावर पाहण्यासारखं खूप जागा आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications