शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहेत हनिमूनसाठीची भारतातील स्वस्त आणि मस्त ठिकाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 8:36 PM

1 / 6
आपला हनिमून अविस्मरणीय व्हावा, असे प्रत्येक नवविहाहित जोडप्याला वाटत असते. पण बजेडमुळे बऱ्याचजणांना महागडया पर्यटनस्थळी जाणे शक्य होत नाही. मात्र भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही अगदी किफायतशीर बजेटमध्ये तुमचा हनिमून यादगार बनवू शकता.
2 / 6
दार्जिलिंग - दार्जिलिंग हे भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील पाच दिवसांच्या ट्रिपसाठी तुम्हाला 18 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
3 / 6
जैसलमेर - तुम्ही जर कुठल्या ऑफबीट हनिमून डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर जैसलमेर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. येथील चार रात्रींच्या वास्तव्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
4 / 6
काश्मीर - काश्मीरला येथील सौंदर्यामुळे भारतातील स्वर्ग म्हटले जाते. येथील सृष्टिसौंदर्यामुळे तुमच्या हनिमूनला चार चाँद लागू शकतात. काश्मीरमध्ये पाच रात्रींच्या वास्तव्यासाठी 15 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
5 / 6
लक्षद्विप - गोवा, अंदमान आदी ठिकाणी हनिमूनसाठी जाणे तुम्हाला महागडे वाटत असेल तर तुमच्यासाठी लक्षद्वीप हा उत्तम पर्याय आहे. येथील चार रात्रींच्या वास्तव्यासाठी सुमारे 35 हजार रुपये खर्च येऊ शकतो.
6 / 6
नैनिताल - नैनितालला भारताती प्रमुख हनिमून डेस्टिनेशन मानले जाते. येथून तुम्ही कॉर्बेट पार्क, मुक्तेश्वर, अल्मोड़ा आणि रानीखेत आदी ठिकाणीही जाऊ शकता. दोन जणांसाठी नैनितालची पाच दिवसांची ट्रिप 20 ते 25 हजार रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकते.
टॅग्स :tourismपर्यटन