शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 5:43 PM

1 / 7
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या राजस्थानमध्ये इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आहेत. अशाच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंचे एक शहर आहे ते म्हणजे उदयपूर. या उदयपूरमधील अशाच काही वास्तूंची केलेली ही सफर.
2 / 7
लेक पॅलेस - तलावामध्ये असलेला लेक पॅलेस ही उयपूरमधील लोकप्रीय वास्तू आहे. पूर्वी ही वास्तू जग निवास म्हणून ओळखली जाई. आता या वास्तूचे रूपांतर एका हॉटेलमध्ये झाले आहे.
3 / 7
जग मंदिर - जग मंदिर हे उदयपूरमधील पिछोला लेकमधील एका छोट्या बेटावर स्थित आहे. या मंदिराला तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत भेट देऊ शकता.
4 / 7
सिटी पॅलेस - उदयपूरमध्ये असलेला सिटी पॅलेस हा महाराणा उदय सिंह याने बांधून घेतला होता. हा पॅलेस युरोपियन, चिनी आणि मध्ययुगीन बांधकामाचा उत्तम नमुना आहे.
5 / 7
फतेहसागर तलाव - फतेहसागर तलाव हे उदयपूरचं खास आकर्षण आहे. या तलावाची गणना राजस्थानमधील सर्वात सुंदर तलावांमध्ये होते. या तलावामध्ये तीन छोटी बेटे आहेत.
6 / 7
कुंभलगड किल्ला - कुंभलगड किल्ला उदयपूरपासून 64 किमी अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून 1900 मीटर उंचावर असलेला हा किल्ला बांधकाम शैलीचे उत्तम उदाहरण आहे.
7 / 7
मान्सून पॅलेस - द मान्सून पॅलेस मेवाडचे राजे महाराणा सज्जन सिंह यांनी बांधला होता. हवामानाची माहिती आणि पावसाळ्यात ढगांचा आनंद लुटण्यासाठी हा पॅलेस बांधण्यात आला होता. म्हणूनच त्याला द मान्सून पॅलेस असे म्हणतात.
टॅग्स :Rajasthanराजस्थानtourismपर्यटनWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिन