These are some romantic places in the country
ही आहेत देशातील काही रोमँटिक ठिकाणं By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 5:59 PM1 / 7उदयपूर येथील ओबेरॉय उदयविलास हे स्थळ लोकप्रिय आहे. याठिकाणी पर्यटक येतात.2 / 7पिंक सिटी जयपूरमधील सुजन राजमहल ही जागा सर्वात रोमँटिक असल्याचे म्हटले जाते.3 / 7अंदमान-निकोबार येथील जलाकरा हे बेट रोमान्स करण्यासाठी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.4 / 7केरळमध्ये अनेक रोमँटिक ठिकाणं अतिशय सुंदर आहेत. येथील अॅलेपी खूप छान ठिकाण आहे. बॅकवॉटर, हाऊसबोट आणि कालव्यांमुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.5 / 7उत्तराखंडमधील चमोलीमध्ये वसलेल्या ऑली या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यामध्ये नवदाम्पत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. स्किईंग करण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.6 / 7जसलमेर या शहराला प्रचंड मोठा इतिहास आहे. शेकडो वर्षांच्या प्रथा-परंपरा या शहरानं आजही जपल्या आहेत. थार वाळवंटातील मुक्काम, उंटांवरील प्रवास, अनेक ऐतिहासिक आणि सुंदर राजवाडे यांच्यामुळे जसलमेर शहराला दिलेली भेट अविस्मरणीय ठरते.7 / 7आसाममध्ये असणारं हॅफलाँग हिल स्टेशन कपल्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. निसर्गसौंदर्यानं नटलेलं हे ठिकाण डोंगरांच्या कुशीत वसलेलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications