These are top 8 worlds beautiful mountain towns and villages
डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेली जगातली 8 सुंदर शहरं आणि गावं! By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 2:16 PM1 / 8बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र चादरीने झाकले गेलेले डोंगर आणि सुंदर हिरवेगार डोंगर पाहिल्यावर कुणाच्याही मनात गुदगुल्या होऊ लागतात. एकदा तरी या ठिकाणी जावं असं अनेकांना वाटतं राहतं. त्यात जर या डोंगरांमध्ये शहरं किंवा गावं असतील तर इथे फिरण्याची मजा काही औरच असेल. चला जाणून घेऊया जगातल्या अशाच काही शहरांबाबत आणि गावांबाबत ज्यांचा थेट संवाद निसर्गाशी होतो. (Image Credit : www.tripstodiscover.com)2 / 8स्पेन, कोलोराडो - जगभरात स्कीईंगसाठी प्रसिद्ध असलेले स्पेन ८ हजार फूट उंचीवर स्थित आहे. हे व्हाईट नदीवर असलेल्या नॅशनल पार्कच्या आत एल्क माऊंटेनने घेरलेलं सुंदर शहर आहे. या शहराची आणखी एक खासियत म्हणजे इथे लागोपाठ होणारे उत्सव. या उत्सवांमध्ये म्युझिक आणि खाण्याची चांगलीच चंगळ करायला मिळते. (Image Credit : www.nerdwallet.com)3 / 8जर्मॅट, स्वित्झर्लंड - स्वित्झर्लंडमधील हे सुंदर डोंगरी गाव ५ हजार २७६ फूटाच्या उंचीवर वसलेलं आहे. हे गाव येथील सर्वात उंच डोंगर मेटरहॉर्नवर वसलेलं आहे. या ठिकाणाची खासियत म्हणजे इथे चार्ल्स कुओनन सस्पेंशन ब्रिज आहे. हा ब्रिज जगातला सर्वात लांब पायी चालण्याचा ब्रिज आहे. 4 / 8इन्सब्रक, ऑस्ट्रिया - ऑस्ट्रियामधील इन्सब्रक हे ठिकाण पर्यटकांची सर्वात जास्त पसंती असलेलं ठिकाण आहे. हे टायरोल क्षेत्राची राजधानी असून हे शहर समुद्र सपाटीपासून १ हजार ८८३ फूट उंचीवर आहे. येथील सुंदर नजारे पाहण्यासोबतच महल, पूल, चर्च आणि संग्रहालयही पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात.5 / 8रूगॉन, फ्रान्स - फ्रान्समधील हे शहर इतर शहरांसारख झगमगाटापासून वेगळं आणि शांत आहे. हे गाव एका पठारावर वसलेलं आहे. शांतता आणि निसर्गाचा आनंद हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. 6 / 8ब्लेड, स्लोवेनिया - स्लोवेनियाच्या वरच्या कारनिओला क्षेत्रात बर्फाच्या तलावावर वसलेलं ब्लेड हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून १ हजार ६६५.७ फूट उंचीवर आहे. इतिहास प्रेमींना हे शहर आवर्जून बघायला हवं. 7 / 8पार्क सिटी, यूटा - सनडान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ओळखलं जाणारं हे यूटसचं शहर ७ हजार फूट उंचीवर स्थित आहे. जगातले सर्वात चांगले पहाडी रिसॉर्टसाठी लोकप्रिय होण्याआधी पार्क सिटी शहर हे चांदीच्या खदानीसाठी प्रसिद्ध होतं. 8 / 8व्हिस्लर, कॅनडा - रिझॉर्ट शहराच्या नावाने ओळखलं जाणारं हे व्हिस्लर शहर २ हजार २०० फूट उंचीवर ब्रिटिश कोलंबियाच्या कोस्ट माऊंटेनमध्ये स्थित आहे. इथे वर्षभर पर्यटकांनी मोठी गर्दी बघायला मिळते. येथील सुंदर नजारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. (Image Credit : www.whistler.ca) आणखी वाचा Subscribe to Notifications