-Ravindra Moreविदेशात फिरायला जायायचे म्हटले म्हणजे गरज असते ती व्हिसाची. बरेचजण व्हिसा लागत असल्याने विदेशात फिरायला जात नाहीत. मात्र असे काही देश आहेत, ज्याठिकाणी जायायला भारतीयांना व्हिसा लागत नाही. जाणून घेऊया त्या देशांबाबत. * इंडोनेशियादक्षिणपूर्व आशियाचा हा देश भारतीयांना व्हिसा आॅन अराव्हल देतो. येथील बालीचे समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. सोबतच येथे हजारो वॉलकॅनिक आइलॅँडदेखील आहेत. * फिजीफिजी एक परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन आहे. या ठिकाणचे खास वैशिट्ये म्हणजे येथे ३३३ ट्रॉपिकल आयलॅँड आहे. सोबतच या ठिकाणचे जगातील सर्वात सुंदर समुद्र किनारे आणि स्पाजमध्येही एन्जॉय करु शकता. * जमैकाया कॅरेबियन देशात डोंगर, रेनफॉरेस्ट आणि रीफ लाइन्ड बीचेस आहेत. याठिकाणी आपण खूपच कमी खर्चात नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात.* डॉमिनीकाया कै रिबियाई आयलॅँड देशात नैसर्गिक हॉट स्प्रिंग्स आणि रेनफॉरेस्ट आहे. याठिकाणी येऊन आपण खºया निसर्गाचा आनंद घेऊ शकता. * थायलॅँड याठिकाणीही पर्यटकांना व्हिसा आॅन अराव्हल दिला जातो. याठिकाणी ट्रॉपिकल बीच, रॉयल पॅलेस आणि भगवान बुद्धांचे मंदिर खूपच सुंदर आणि जगप्रसिद्ध आहे. * मालदीवबॉलिवूड कलाकारांचे खास हॉलिडे डेस्टिनेशन म्हणजे मालदीव होय. याठिकाणी आल्यानंतर पर्यटकाला व्हिसा आॅन अराव्हल दिला जातो. येथील समुद्र किनारे आणि सीनिक ब्यूटी जगात प्रसिद्ध आहेत.