शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील 'या' ठिकाणी फिरण्यासाठी घ्यावी लागते परवानगी, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:33 PM

1 / 6
परदेशात जाण्यासाठी आपल्याला व्हिसाची गरज असते. पण भारतातही अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे परवानगी किंवा परमिटशिवाय प्रवास करता येत नाही. भारतातील या ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीला इनर लाइन परमिशन म्हणतात.
2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमा या ठिकाणांहून जाते. त्यामुळे या ठिकाणांना भेट देण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. नियंत्रण रेषेजवळील लडाखमधील काही ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्हाला परवानगी घेणे आवश्यक आहे.
3 / 6
लडाखमधील नुब्रा घाटी, त्सो मोरीरी लेक, खारदुंग ला पास यासह अनेक ठिकाणे आहेत. ही परवानगी फक्त एका दिवसासाठी वैध आहे. लडाखमध्ये दरवर्षी अनेक देशातील आणि परदेशातील पर्यटक येत असतात.
4 / 6
नागालँडला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. परंतु, नागालँडमधील कोहिमा, मोकोकचुंग, वोखा, दिमापूर, मोन, किफिरे इत्यादींना भेट देण्यासाठी तुम्हाला परमिट आवश्यक आहे. येथे 5 दिवसांचा परवाना 50 रुपयांमध्ये आणि 30 दिवसांपर्यंतचा परवाना 100 रुपयांमध्ये मिळतो.
5 / 6
अरुणाचल प्रदेशात सध्या अनेक ठिकाणी जाण्यासाठी ही परवानगी आवश्यक आहे. या ठिकाणी इटानगर, तवांग, रोइंग, पासीघाट, भालुकपोंग, बोमडिला, झिरो इत्यादींचा समावेश आहे. भूतान, म्यानमार आणि चीनच्या सीमेला लागून असलेले हे राज्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानले जाते.
6 / 6
सिक्कीममधील त्सोंगमो लेक, गोइचला ट्रॅक, नथुला, युमथांग, गुरुडोंगमार लेक यासारख्या भव्य ठिकाणांना परवानगीशिवाय भेट देता येत नाही. या अतिशय मनोरंजक ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्हाला इनर लाइन परमिट घ्यावे लागते.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके