शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 3:48 PM

1 / 6
पजम पोरी (पलक्कड, केरळ) पजम पोरी म्हणजे केळ्याचे पकोडे. पलक्कड रेल्वे स्थानकातील पजम पोरी अतिशय प्रसिद्ध आहे.
2 / 6
आलू दम (खरगपूर, पश्चिम बंगाल) गरम मसाल्यात तयार केला जाणाऱ्या आलू दमचा समावेश उत्तर भारतातील महत्त्वाच्या खाद्यपदार्थांमध्ये होतो. मात्र बंगाली मसाल्यांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या आलू दमची चवच न्यारी. ती खरगपूर रेल्वे स्थानकात चाखता येते.
3 / 6
आलू टिक्की (टुंडला, उत्तर प्रदेश) टुंडला जंक्शनचा समावेश उत्तर मध्य भारतातील मोठ्या स्थानकांमध्ये होतो. या ठिकाणी ट्रेन बराच वेळ थांबते. त्यावेळी आळस झटकून सीटवरुन उठलात, तर तुम्हाला लज्जतदार आलू टिक्की खाता येईल.
4 / 6
चिकन बिरयानी (शोरानूर, केरल) चिकन बिरयानी संपूर्ण भारतात अतिशय चवीनं खाल्ली जाते. दक्षिण भारतातील चिकन बिरयानीच तर बातच न्यारी. केरळमधील शोरानूर रेल्वे स्थानकात चविष्ट बिरयानी मिळते.
5 / 6
कॅमल टी (सुरेंद्रनगर, गुजरात) गुजरातमधील सुरेंद्रनगर स्थानक येथे मिळणाऱ्या चहामुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी चहात उंटिणीचं दूध वापरलं जातं. त्यामुळे चहाचा एक वेगळीच चव येते.
6 / 6
छोले भटुरे (जालंधर, पंजाब) संपूर्ण पंजाबमध्ये तुम्हाला छोले भटुरे खाता येतील. मात्र जालंधर रेल्वे स्थानकातील छोले भटुरेंची लज्जत अतिशय वेगळी आहे.
टॅग्स :foodअन्नtourismपर्यटनIndian Railwayभारतीय रेल्वे