In these ten countries, you can firmly use Indian driving license
या दहा देशात तुम्ही बिनधास्तपणे करू शकता भारतीय ड्रायव्हिंग लायसनचा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 2:40 PM1 / 11भारत आणि परदेशातील वाहतुकीच्या नियमांमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे बाहेरच्या देशात गेल्यावर तुम्ही इच्छा असूनही वाहन चालवू शकत नाही. मात्र जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत जिथे तुम्ही अगदी बिनधास्तपणे भारतीय ड्रायव्हिंग लायसनचा वापर करू शकता. जाणून घेवूया असा देशांविषयी.2 / 11स्वित्झर्लंड - निसर्गरम्य असलेल्या स्वित्झर्लंडमधील रस्त्यांवर ड्रायव्हिंग करण्याची अनेकांची इच्छा असते. स्वीत्झर्लंडमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसनला एका वर्षासाठी मान्यता आहे. त्यामुळे तु्म्ही इथे भारतीय ड्रायव्हिंग लायसन सोबत ठेवून ड्रायव्हिंग करू शकता. 3 / 11नॉर्वे - नॉर्वेमध्येही भारतीय ड्रायव्हिंग लायसनसह ड्रायव्हिंग करण्यास मान्यता आहे. इंग्रजी भाषेत असलेले ड्रायव्हिंग लायसन या देशात मान्य असून, असे लायसन तीन महिन्यांसाठी वैध असते. 4 / 11दक्षिण आफ्रिका - आफ्रिकेमध्येही तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन सोबत बाळगून ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. मात्र हे ड्रायव्हिंग लायसन इंग्रजी भाषेत असणे तसेच त्यावर तुमचे छायाचित्र आणि सही असणे अनिवार्य आहे. 5 / 11ग्रेट ब्रिटन - ग्रेट ब्रिटनमधील इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या प्रांतात तुम्ही भारतीय लायसन सोबत बाळगून ड्रायव्हिंग करू शकता. येथे भारतीय लायसन एका वर्षासाठी वैध आहे. मात्र तेथील वाहतूक खात्याने भारतीय लायसनवर जी वाहने चालवण्यास परवानगी दिलेली आहे, अशीच वाहने तुम्ही चालवू शकता. 6 / 11मॉरिशस - मॉरिशय या निसर्गसौंदर्याने संपन्न असलेल्या छोट्याशा देशातही भारतीय ड्रायव्हिंग लायसन सोबत बाळगून तुम्ही एक महिना ड्रायव्हिंग करू शकता. 7 / 11न्यूझीलंड - न्यूझीलंडमध्येही भारतीय ड्रायव्हिंग लायसन सोबत बाळगून ड्रायव्हिंग करू शकता. मात्र त्यासाठी तुम्ही इंग्रजी भाषेतील ड्रायव्हिंग लायसन स्थानिक भाषेत भाषांतरीत करून घेणे आवश्यक आहे. ही बाब पूर्ण केल्यानंतर तुम्ही न्यूझीलंडमध्ये 1 वर्ष भारतीय लायसनसह ड्रायव्हिंग करू शकाल. 8 / 11फ्रान्स - सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फ्रान्सला भेट देणे हा एक वेगळाच अनुभव असतो. इथेही तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसनसह प्रवास करू शकता. मात्र त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन फ्रेंच भाषेत भाषांतरित करून घेणे आवश्यक आहे. 9 / 11खंडप्राय देश असलेल्या ऑस्ट्रेलियामध्येही तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन सोबत बाळगून ड्रायव्हिंग करू शकता. केवळ हे लायसन इंग्रजी भाषेत असावे अशी अट आहे. ऑस्ट्रेलियात असे लायसन तीन महिन्यांसाठी वैध ठरते. 10 / 11जर्मनी - जर्मनीमध्येही भारतीय ड्रायव्हिंग लायसन सहा महिन्यांसाठी वैध असते. मात्र त्यासाठी हे लायसन German Diplomatic Mission कडून भाषांतरित करून घेणे आवश्य आहे. 11 / 11अमेरिका - अमेरिकेमध्येही भारतीय ड्रायव्हिंग लायसन वैध आहे. मात्र त्यासाठी प्रवास करण्यापूर्वी तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय वाहतूक परवाना आणि आय-94 फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications