Top 7 Most Famous Bird Sanctuaries of India
पक्षीप्रेमींसाठी 'ही' अभयारण्यं ठरतील खास पर्वणी By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 5:16 PM1 / 8विविधतेने नटलेल्या भारतात प्राणी-पक्षांच्या अनेक प्रजाती आढळतात. देशात सात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहेत. ती अभयारण्य कोणती हे जाणून घेऊया.2 / 8राजस्थानमधील भरतपुर पक्षी अभयारण्य हे देशातील सर्वात प्रसिध्द पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात दुर्मिळ पक्षांच्या प्रजाती तसेच फुलांच्याही सुंदर प्रजाती पाहायला मिळतात.3 / 8गुजरातमध्ये नल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात पाण्यात राहणारे पक्षी मोठ्या प्रमाणावर आहेत.4 / 8म्हैसूरपासून सोळा किलोमीटर अंतरावर श्रीरंगपटनम रस्त्याच्या अगदी बाजूला रंगनथिट्टूचं पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात 170 हून अधिक दुर्मिळ पक्षांच्या प्रजाती आहेत. 5 / 8ओडिशातील चिल्का हे पक्षी अभयारण्य अत्यंत सुंदर आहे. येथे शेकडो प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती पाहायला मिळतात.6 / 8गुरुग्राममधील सुलतानपुर पक्षी अभयारण्य खूप प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात स्थानिक पक्षांबरोबरच स्थलांतर करुन आलेल्या २५० पक्षांच्या प्रजाती आढळतात. 7 / 8तमिळनाडूतील कांचीपुरम येथे वेदंथंगल पक्षी अभयारण्य आहे. दरवर्षी ठराविक ऋतुमध्ये येथे ४० हजाराहून अधिक स्थलांतरीत पक्षी येतात.8 / 8केरळमध्ये कुमारकोम पक्षी अभयारण्य आहे. १४ एकर परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात पक्षांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications