Top ten lesser known destinations in India
भारतातील ९ सुंदर डेस्टिनेशन्स जे कमीच लोकांना माहीत आहेत! By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 3:32 PM1 / 10जर तुम्ही फिरायला जाण्यासाठी शांत वातावरण असलेल्या ठिकाणांचा शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. भारतातील ही १० ठिकाणे फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन्स आहेत. पण या ठिकाणांबाबत फार कुणाला माहीत नाही. त्यामुळे तुम्ही जाऊ शकता आणि सुट्टी एन्जॉय करू शकता. 2 / 10कर्नाटकात अनेक लोकप्रिय डेस्टिनेशन्स आहेत. पण हे ठिकाण फार प्रकाशझोतात आलं नाहीय या ठिकाणाला दक्षिण भारतातील चेरापूंजी म्हटलं जातं. हे गाव फार सुंदर असून येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला भुरळ घालेल असंच आहे. 3 / 10भारतातील स्कीइंग स्थळांमध्ये ऑलीचाही समावेश आहे. या ठिकाणाला ऑली बग्यालही म्हटलं जातं. स्थानिक भाषेत याचा अर्थ गवत असा होतो. हा परिसर बर्फाने वेढलेल्या हिमालयात आहे. 4 / 10राजस्थानमधील बूंदी हे ठिकाण उदयपूर आणि जयपूर इतकंच लोकप्रिय आहे. या परिसरातील किल्ले आणि मंदिरे बघण्यासारखी आहेत. राजस्थानचा खरा फिल घेण्यासाठी या ठिकाणा फिरायला यायला पाहिेजे. 5 / 10उत्तराखंडचा भाग असलेलं चोपटा हे ठिकाण दिल्लीहून साधारण ४५० किमी अंतरावर आहेत. चोपटामधून हिमालयाचं सौंदर्य फार जवळून बघायला मिळतं. 6 / 10आंध्र प्रदेशमधील एक छोट गाव आहे गांदीकोटा. अजून हे गाव सामूहीक पर्यटनापासून लांब राहिलं आहे. हे गाव फार सुंदर असून या गावाला भारताचं ग्रॅन्ड कॅन्यन असंही म्हटलं जातं. येथील डोंगर बघण्यासारखे आहेत. 7 / 10केरळमधील हे एक छोटं आणि सुंदर गाव आहे. भारतात सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या गावांमध्ये या गावाचा समावेश आहे. वेगवेगळ्या प्राण्यांना बघण्यासोबतच इथे तुम्ही निसर्गाचाही आनंद घेऊ शकता. 8 / 10जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ एकांतात घालवायचा असेल तर तुम्ही हरसिलला भेट देऊ शकता. भागीरथी नदीच्या तटावर हे छोटं गाव आहे. 9 / 10हेमिस हाय आल्टीट्यूट राष्ट्रीय उद्यान जम्मू-काश्मीरच्या पूर्व लडाख क्षेत्रात आहे. हे ठिकाण वेगवेगळ्या प्राण्यांसाठी लोकप्रिय आहे. जंगली भालू इथे बघायला मिळतात. तसेच इथे ४०० वर्ष जुने बौद्ध मठही आहेत. 10 / 10गुजरातचं पाटण हे राणीच्या चांगल्या पावलांसाठी ओळखलं जातं. हा छोटासा परिसर सरस्वती नदीवर स्थित आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications