-Ravindra Moreआपल्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून प्रत्येक सेलिब्रेटी त्यांच्या आवडीच्या ठिकाणांना भेट देत असतात. विशेषत: प्रत्येक ऋुतूमानानुसार त्यांचे ठिकाण ठरलेले असते. नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली असून या दिवसात फिरण्याची मजा काही औरच असते. सेलिब्रेटी या काळात पावसाचा आनंद घेण्यासाठी काही ठराविक ठिकाणांना पसंती देतात. जाणून घेऊया त्या ठिकाणांबाबत...* लोणावळापावसाळ्यात लोणावळा परिसरातील डोंगर आणि दऱ्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी सेलिब्रेटींची अधिक पसंती असते. या ठिकाणाला भारताचे स्वित्झरलॅँडदेखील म्हटले जाते. पावसाळ्यादरम्यान या ठिकाणी निसर्ग खूपच जवळून पाहण्याचा आनंद मिळतो. येथे एक प्राचीन बौद्ध मंदीर आहे. विशेष म्हणजे दगड कापून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. * दूधसागर मान्सूनमध्ये लोक गोवाला आॅफ सिजन बोलतात. मात्र आपण मान्सूनमध्येच गोवाचा आनंद घेण्यासाठी जावे. सेलिबे्रटीदेखील याठिकाणी पावसाळ्यात पावसाचा आनंद आणि थंडगार हवेचा आनंद घेण्यासाठी जातात. विशेष म्हणजे गोवा आणि कर्नाटक सिमेवर दूधसागर धबधबा पावसाळ्यास ओसंडून वाहत असतो. दूधसागर धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य या दिवसात अधिकच खुलून दिसते. हा तोच धबधबा आहे जो ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटात दाखविण्यात आला आहे. घनदाट जंगलामध्ये विस्तारलेला दूधसागर धबधबा पाहण्यासाठी जून पासून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान खूपच गर्दी असते. हा धबधबा लांब अंतराने पाहिल्यास डोंगरावरुन दुधाचा सागर वाहत असल्याचे दिसते. * आग्रापावसाळ्यात रोमॅँटिक सेलिब्रेटी कपल्स विशेषत: आग्राला भेट देतात. प्रेमाचे प्रतिक आणि जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहल याठिकाणी हे रोमॅँटिक कपल्स आपल्यातील प्रेम भावना प्रकट करण्यासाठी जातातच. ताजमहलाशिवाय याठिकाणी बरेच किल्ले आणि राजवाडे आहेत. विदेशी पर्यटकदेखील याठिकाणी मोठ्याप्रमाणात भेट देतात. * उदयपुर ज्या सेलिब्रेटींना डोंगर दऱ्यांमध्ये फिरायला आवडत नाही ते राजस्थानमधील उदयपुरला आवर्जून भेट देतात. पावसाळ्यात उदयपुराचे सौंदर्य अधिकच खुलते. विशेषत: या दिवसात रंगीत राजस्थानच्या सौंदर्याची झलक पाहावयास मिळते. येथील संस्कृती आणि राजवाडे पाहून आपला सर्व थकवा दूर होतो. Also Read : मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !