'Tree House' - The summer picnic should be here munnar
'ट्री हॉऊस'- उन्हाळ्यात पिकनिकला इथं जायला हवं By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 4:51 PM1 / 5 व्हेथरी ट्री हाऊस - केरळमधील वायनाड येथे असलेलं निसर्गरम्य ट्री हाऊस. उन्हाळ्यात असा गर्द झाडी असलेल्या घरांत 4 महिन्यांसाठी राहायला जावं असंच कुणालाही वाटेल. 2 / 5थेकड्डी ट्री रिसॉर्ट - झाडांच्या गर्द सावलीत राहायला कुणाला आवडत नाही. मायेची ऊब आणि झाडाची सावली माणसाला नेहमीच सुखावून जाते. मुदराईपासून 140 किमी अंतरावर हे ट्री रिसॉर्ट आहे. 3 / 5द नेस्ट - कुर्ग - लाकडी बुंध्यांनी अन् दोरखंडाने उभारलेलं हे घर सौंदर्यतेचा आणि कलाकृतीचा उत्तम नमूना आहे. तुमचं मन, शरीर प्रसन्न ठेवणारा हा बंगला आहे. त्यामुळे म्हैसूरपासून केवळ 94 किमी अंतरावरील या द नेस्ट ट्री हाऊसला भेट द्यायलाच हवी. 4 / 5द मचान लोणावळा - लोणावळ्यातील द मचान येथे ट्री हाऊस ही नैसर्गि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. चंद्रप्रकाशासारखी शितल शांतता, पक्ष्यांचा हलिकासा किलबिलाट, मुंबईपासून केवळ 101 किमी अंतरावर हे ट्री हाऊस आहे. 5 / 5नेचर झोन रिसॉर्ट मुन्नार - चहाच्या बागांच्या मध्यवर्ती असलेलं हे सौदर्याची खाण असणारं ट्री रिसॉर्ट लोभनीय आहे. उत्तम फर्निचर, बांबूच्या झाडांची लहानशी घरं, लक्षणीय आहेत. कोचीपासून 126 किमी अंतरावर हे रिसॉर्ट आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications