शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंटार्टिका खंडाबद्दलच्या 'या' गोष्टी तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घालतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 7:09 PM

1 / 7
अंटार्टिकाच्या काही भागांमध्ये 20 लाख वर्षांपासून पाऊसच झालेला नाही. याशिवाय या भागात बर्फवृष्टीदेखील झालेली नाही.
2 / 7
अंटार्टिका खंडावर ब्लड फॉल नावाचा झरा आहे. यामधून लाल रंगाचं पाणी वाहतं. याठिकाणी लोहाचं प्रमाण अधिक आहे. ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेमुळे बर्फावर लाल रंगाच्या खुणा कायम राहतात.
3 / 7
जगातील 90 टक्के बर्फ अंटार्टिका खंडात आहे. याशिवाय जगातील 70 टक्के स्वच्छ पाणीदेखील याच ठिकाणी आहे. अंटार्टिकावरील सर्व बर्फ विरघळल्यास समुद्राची पातळी 200 फूटांनी वाढेल आणि संपूर्ण जग बुडेल.
4 / 7
अंटार्टिका खंडावरील बर्फाची जाडी साधारणत: 1.6 किलोमीटर इतकी आहे. काही ठिकाणी तर बर्फाची जाडी तब्बल 4.8 किलोमीटर आहे.
5 / 7
अद्याप माणसांचं अस्तित्व नसल्यानं या ठिकाणी टाईम झोन नाही.
6 / 7
अंटार्टिका खंडावर आतापर्यंत दिसलेला सर्वात मोठा बर्फाचा तुकडा तब्बल 295 किलोमीटर लांब आणि 37 किलोमीटर रुंद आहे. याचं क्षेत्रफळ 11000 चौरस किलोमीटर इतकं आहे.
7 / 7
अंटार्टिका खंडावर सर्वाधिक उल्कापिंड आढळून येतात. या ठिकाणी सर्वाधिक उल्कापिंड कोसळतात, हे यामागचं कारण नाही. या ठिकाणचं वातावरण अतिशय शुष्क असल्यानं उल्कापिंडांचा क्षय होत नाही. त्यामुळे जगाच्या तुलनेत अंटार्टिका खंडावर सर्वाधिक उल्कापिंड दिसतात.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स