शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाराणसीतील 'ही' शानदार ठिकाणं, जगभरातून भेट देण्यासाठी येतात पर्यटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 3:26 PM

1 / 5
उत्तर प्रदेशातील वाराणसी हे ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. काशी विश्वनाथ धाम बांधल्यानंतर जगभरातील पर्यटकांची येथे ये-जा सुरू आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत वाराणसीला जाण्याचा विचार करत असाल तर 'या' 5 ठिकाणांना भेट देऊ शकता.
2 / 5
वाराणसीत 12 ज्योतिर्लिंगांपैकी श्री काशी विश्वनाथ मंदिर हे मुख्य आहे. अलीकडेच बाबा विश्वनाथांचे अप्रतिम भव्य आणि नवीन धाम तयार करण्यात आले आहे. काशीचे सौंदर्य पाहिल्याशिवाय काशीला भेट देणे अपूर्ण आहे.
3 / 5
बनारस हिंदू विद्यापीठ म्हणजेच BHU मध्ये बांधलेले नवीन विश्वनाथ मंदिर अतिशय सुंदर आहे. पांढऱ्या दगडांनी बनलेले हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेबरोबरच पर्यटनाचेही केंद्र आहे. संध्याकाळी मंदिर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघते.
4 / 5
बनारसचे सारनाथ सुद्धा परदेशी पाहुण्यांबरोबरच देशी पर्यटकांनाही खूप आवडते. ऐतिहासिक बौद्ध मंदिर, धमेख स्तूप, चौखंडी स्तूप याशिवाय एक संग्रहालय आणि एक लहान प्राणीसंग्रहालय आहे. शांततेचे क्षण घालवण्यासाठी पर्यटक येथे येतात.
5 / 5
जर तुम्ही वाराणसीला भेट देण्यासाठी येत असाल, तर गंगा नदीवर लक्झरी क्रूझची सफर नक्की करा. ही क्रूझ रविदास घाट ते राजघाटापर्यंत चालवली जाते. या क्रूझमधून काशीच्या सुबह-ए-बनारसच्या विहंगम दृश्याचा आनंद लुटता येतो.
टॅग्स :VaranasiवाराणसीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स