Visit 10 'Famous Tourist Places' in Punjab!
पंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 3:26 PM1 / 10अमृतसर - पंजाबला शिखांची नगरी असंही म्हटलं जातं. पंजाबच्या खान-पान, पेहरावात एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. पंजाबमधलं अमृतसर फारच प्रसिद्ध आहे. अमृतसरमधल्या सुवर्णमंदिरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.2 / 10चंदीगड- पंजाबची राजधानी असलेलं चंदीगडही प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे रोज गार्डन, फन सिटी, रॉक गार्डनसारखी फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. 3 / 10शिशमहल- पंजाबला भारताची शान संबोधलं जातं. इथली शेती आणि हिरवळ नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असते. पंजाबमधलं फार जुनं असलेलं शिशमहलही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. 4 / 10जालंधर- पंजाबमधलं जालंधर शहर पर्यटनासाठी चांगला पर्याय आहे. इथे आपल्याला देवी तलाव मंदिर, वंडरलँड थीम पार्क, सेंट मेरी कॅथेड्रल चर्च, निक्कू पार्क आदी ठिकाणं नावाजलेली आहेत. 5 / 10आनंदपूर साहिब- आनंदपूर साहिब हे प्रसिद्ध गुरुद्वारांपैकी एक आहे. इथे भाविकांची कायमच गर्दी असते. 6 / 10लुधियाना- लुधियानात फिरण्यासाठी लोधी फोर्ट, रुरल हेरिटेज म्युझिअम, टायगर जू, नेहरू रोज गार्डन प्रसिद्ध आहे. 7 / 10बठिंडा- पंजाबमधल्या बठिंडामध्ये अनेक ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात. 8 / 10रोपड- आनंदपूर साहिबसारखं रोपड वेटलँडही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. इथलं गुरुद्वारा साहिब आणि जुनं शिव मंदिर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.9 / 10कपूरथला- कपूरथलामध्ये आपण पंज मंदिर, जगजित क्लब सारखी ठिकाणांची भटकंती करू शकतो. तसेच इथल्या शालीमार गार्डनमध्येही पूर्ण दिवस व्यतित करता येतो. 10 / 10पठाणकोट- पठाणकोटमध्ये मुक्तेश्वर मंदिर, आशापूर्णी मंदिर, प्राचीन कालीमाता मंदिर, नुरपूर किल्ला आदी ठिकाणं आपल्याला पाहता येतात. तसेच इथे ऐतिहासिक शाहपुर्कंदी किल्लाही आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications