Visit these places of Jammu and Kashmir this winter
या हिवाळ्यात जम्मू काश्मीरच्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 4:44 PM1 / 5नाताळ आणि नविन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस राहीले आहेत. अजुनही तुम्ही कुठे जाण्याचा प्लॅन केला नसेल तर आजच तयारीला लागा. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला थंडीचा तुफान आनंद घेता येईल.2 / 5भारतातल्या जम्मू काश्मीर या ठिकाणी तुम्ही भेट देण्यासाठी जाऊ शकता. तसंच हे वर्ष जम्मू काश्मीरसाठी खूप महत्वपूर्ण आहे. कारण य़ा वर्षी ऐतिहासीक निर्णय घेण्यात आले. या ठिकाणचे प्राकृतीक सौदर्य पाहण्याची तसंच थंडिची मजा घेण्याचा अनुभव काही वेगळाच आहे.3 / 5भारातातील सगळ्यात प्रसिध्द अशा थंड हवेच्या ठिकाणांपैकी गुलमर्ग हे महत्वाचे आणि सौंदर्यांनी परिपूर्ण असे पर्यटन स्थळ आहे. या प्रदेशाला फुलोंकी घाटी असं सुद्दा म्हटलं जातं. या ठिकाणी कोकरनाग नावाचा झरा आहे.4 / 5परी महल श्रीनगर शहरापासून ११ किमीच्या अंतरावर आहे. मुगल बादशाहा शाहजहाँ याचा मुलगा दाराशिकोह याने या वास्तूला शाळेचे रुप दिले. 5 / 5जम्मू काश्मीरमधील हिंदू धर्मियांचे पवित्र स्थळ म्हणून मट्टन हे स्थळ प्रसिद्द आहे. या ठिकाणी अत्यंत सुंदर असे शिवमंदिर आहे. मट्टन हे श्रीनगरपासून ६१ कीमीच्या अंतरावर आहे. या ठिकाणी मंदिरच नाही तर एक जुनं खंडर सुद्धा आहे. ज्याला सुर्यमंदिर या नावाने ओळखले जाते. (Image credit-skymetweather.com) आणखी वाचा Subscribe to Notifications