Where do the 3 oceans meet in India? Know the answer
इथे होतो तीन महासागरांचा संगम? परदेशात नाहीतर देशातच आहे हे ठिकाण! By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 3:58 PM1 / 7नद्यांचा संगम प्रयागराजला म्हटलं जातं. कारण इथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या एकत्र येतात. इथे कुंभ आणि अर्द्धकुंभमेळा लागतो. ज्यात लाखो भाविक स्नान करतात. नद्यांचं तुम्हाला माहीत असेल. पण तुम्हाला महासागरांचा संगम कुठे आहे माहीत आहे का? तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, महासागरांचा संगम भारतातच होतो. जिथे तीन महासागर एक होतात.2 / 7भारत देश तीन बाजूने समुद्राने तर एका बाजूने हिमालयाने वेढलेला आहे. 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा समुद्र तटाशी जुळलेल्या आहेत. या तटांवर मुंबई, पॉंडिचेरी आणि कोच्चिसारखे शहर वसले आहेत.3 / 7याच शहरांपैकी एक आहे कन्याकुमारी. भारतातील दक्षिण राज्य तामिळलनाडुमधील समुद्र किनारा असलेलं एक सुंदर शहर जे नेहमीच पर्यटकांचं फेव्हरेट आहे. दरवर्षी इथे 20 ते 25 लाख पर्यटक येतात.4 / 7या शहराचं नाव देवी कन्याकुमारीच्या नावावर पडलं आहे. तिला भगवान श्रीकृष्णाची बहीण मानलं जातं. कला-धर्म आणि संस्कृतीचं केंद्र कन्याकुमारी तीन समुद्र- बंगालची खाडी, हिंद महासागर आणि अरबी समुद्राने वेढलेलं आहे. तिन्ही समुद्र इथे येऊन मिळतात.5 / 7कन्याकुमारीच्या दक्षिणेला हिंद महासागर, पूर्वेला बंगाल खाडी आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महासागरांच्या मीलनामुळेच कन्याकुमारीला सागरांचा संगम म्हटलं जातं. समुद्रांमुळे इथे सूर्यास्त आणि सूर्योदयाचा खास नजारा बघायला मिळतो. लोक दूरदुरून हा नजारा बघण्यासाठी इथे येतात.6 / 7इथे भारतातील सगळ्यात उंच प्रतिमांपैकी एक तिरूवल्लुवरची मूर्ती सुद्धा आहे. याची उंची 133 फूट आणि वजन 2 हजार टनपेक्षा जास्त आहे. ही तयार करण्यासाठी 1283 दगडांचा वापर झाला.7 / 7इथे फिरण्यासाठी इतरही अनेक ठिकाणं आहेत. समुद्रात स्वामी विवेकानंद यांची मूर्तीही आहे. जे विवेकानंद स्मारक म्हणून ओळखलं जातं. याच ठिकाणी विवेकानंद ध्यान लावून बसले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications