शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डिसेंबरमध्ये वेकेशन ट्रीप प्लॅन करताय? मग 'या' ठिकाणांना भेट देऊन लुटा सुट्ट्यांचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 1:08 PM

1 / 6
डिसेंबर महिना सुरू व्हायला आता काहीच दिवस बाकी आहेत. क्रिसमसच्या सुट्ट्या तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी लोक वेकेशन ट्रीप प्लॅन करतात. जर तुम्ही सुद्धा डिसेंबरमध्ये एखादी ट्रीप प्लॅन करताय तर आम्ही तुम्हाला भारतातील काही आकर्षक पर्यटनस्थळांविषयी सांगणार आहोत.
2 / 6
औली: औली हे उत्तराखंडमधील फिरण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे.मिनी स्विजरलैंड म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.औली हे ठिकाण समुद्रसपाटीपासून साधारणत: ९ हजार फूट उंचीवर असलेले अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे.चहु बाजूंनी सुंदर हिमशिखरे, देवदारची घनदाट जंगले आणि भारतातील सर्वात वेगवान समजला जाणारा रोपवे पर्यटकांच्या आकर्षणात महत्वाची भूमिका बजावतो.
3 / 6
तवांग : तवांग हे भारताच्या नैऋत्येला वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे.तवांगमधील बर्फाच्छादित प्रदेश,सुंदर धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरतात, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असते.
4 / 6
मनाली : कुल्लू मनाली या ठिकाणाचे नुसते नाव घेतले तरी मन थंडावून जाते. डिसेंबरमध्ये थंडीच्या महिन्यात तेथील वातावरण मनाला मोहुन टाकते.या ठिकाणी आपला विकेंड घालवण्यात पर्यटकांचा कल असतो.
5 / 6
राजस्थान : जर तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तसेच तुम्हाला कोठे जायचे असा प्रश्न पडत असेल, तर आम्ही तुम्हाला राजस्थानमधील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही फिरण्याचा आनंद तर घ्याल.माउंट आबु,बांसवाडा,जैसलमेर,उदयपुर यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी तुम्ही राजस्थानला भेट देऊ शकता.
6 / 6
मैचुका व्हॅली : हिमनद्यांमधून उगम पावणारी सियांग नदी मेचुका व्हॅलीतून वाहते. मैचुका व्हॅली चित्तथरारक दृश्य अनेकांना आकर्षित करते. त्यामुळे मैचुका व्हॅलीला भेट देण्याची पर्यटकांची पसंती असते.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स