Wonderful facts about Tirupati Balaji Temple myb
तिरूपती बालाजीच्या हनुवटीवर का लावतात चंदन? 'या' मंदिराबद्दल आश्चर्यकारक गोष्टी वाचून व्हाल अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 3:20 PM1 / 13देशातील मुख्य धार्मिक स्थळांमधील तिरूपती बालाजी मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. अनेक मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी आणि राजकीय नेते इथे दर्शनासाठी येतात. कारण तिरूपती बालाजींच्या अनेक चमत्कारिक कथा प्रचलित आहेत. आज आम्ही तुम्हाला या मंदिराबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला माहितही नसतील.2 / 13मुख्य द्वाराच्या डावीकडे आणि बालाजीच्या डोक्यावर अनंताळवारजी यांच्या द्वारे मारल्याचे निशाण आहेत. बालपणी बालाजींच्या हनुवटीतून रक्त आलं होतं. तेव्हापासूनच बालाजींच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली.3 / 13भगवान बालाजी यांच्या डोक्यावर आजही रेशमी केस आहेत आणि हे केस कधीच विस्कटत नाहीत. हे केस नेहमीच ताजे वाटतात.4 / 13मंदिरापासून २३ किलोमीटर दूर एक गाव आहे. त्या गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश निषेध आहे. इथे लोक नियमाने राहतात. येथील महिला ब्लाउज परिधान करत नाहीत. याच गावातून आणलेली फुलं देवाला अर्पण केली जातात.5 / 13भगवान बालाजी गर्भगृहाच्या मध्यभागी असल्याचे दिसतात. पण मूर्ती प्रत्यक्षात उजव्या बाजूला आहे.6 / 13भगवान बालाजींच्या मूर्तीला दररोज खाली धोतर आणि वर साडी नेसवली जाते. कारण असे मानले जाते की, भगवान बालाजीमध्येच देवी लक्ष्मी सामावली आहे.7 / 13इथे देवाला अर्पण करण्यात आलेली एकही वस्तू बाहेर नेली जात नाही म्हणजे कुणालाही प्रसाद म्हणून दिली जात नाही. बालाजींच्या मूर्तीमागे एक विहीर आहे त्यात फुलं, प्रसाद विसर्जित केला जातो.8 / 13बालाजीच्या जलकुंडात विसर्जित केल्या वस्तू तिरूपती मंदिरापासून २० किलोमीटर दूर वेरपेडूमध्ये बाहेर येतात.9 / 13भगवान बालाजींची पाठ कितीही वेळा पुसली तरी त्यावर ओलावा नेहमीच राहतो. तिथे कान लावून ऐकलं तर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.10 / 13दर गुरूवारी तिरूपती बालाजींच्या मूर्तीवर चंदनाचा लेप लावला जातो. असे म्हणतात की, हा लेप काढल्यावर मूर्तीवर लक्ष्मी देवीची चिन्हे दिसतात. हा काढलेला चंदनाचा लेप नंतर विकला जातो.11 / 13 बालाजीच्या मंदिरात एक पणती सतत तेवत असते ही पणती किती हजार वर्षांपासून अशीच तेवत आहे कुणालाच माहीत नाही.12 / 13असे सांगितले जाते की, १८०० मध्ये मंदिर परिसर १२ वर्षांसाठी बंद करण्यात आला होता. एका राजाने १२ लोकांना ठार करून भिंतीवर टांगलं होतं. त्यावेळी वेंकटेश्वर प्रकट झाले होते, अशीही मान्यता आहे.13 / 13असे सांगितले जाते की, १८०० मध्ये मंदिर परिसर १२ वर्षांसाठी बंद करण्यात आला होता. एका राजाने १२ लोकांना ठार करून भिंतीवर टांगलं होतं. त्यावेळी वेंकटेश्वर प्रकट झाले होते, अशीही मान्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications