The world’s best designed bus stops
'ही' आहेत जगातील सर्वात सुंदर बस स्थानकं By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 3:23 PM1 / 7जगभरातील अनेक सुंदर गोष्टी पाहण्याची इच्छा सर्वांनाच असते. निसर्गरम्य वातावरणातील पर्यटन स्थळं सगळ्यांनाच आकर्षित करतात. मात्र जगात अशी काही बस स्थानकं आहेत जी एअरपोर्टसारखी अप्रतिम आहेत. जगातील ही सर्वात सुंदर बस स्थानकं कोणती ते जाणून घेऊया.2 / 7ड्रावा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले क्रोशिया येथील बसस्थानक हे जगातील सर्वात सुंदर बस स्थानकापैकी एक आहे. 3 / 7पोर्तुगाल येथील बस स्थानक हे पूर्णपणे काचेचा वापर करून तयार केलेले आहे. अत्याधुनिक सोयींनी सज्ज असलेल्या या बस स्थानकात एकावेळी 96 बस उभ्या राहतात. 4 / 7जर्मनीचे बस स्थानक हे 1800 स्क्वेअर मीटरच्या पंखासारख्या आकाराच्या छतासाठी प्रसिद्ध आहे. 5 / 7ब्रिटनमधील स्लो बस स्थानक हे एखाद्या हॉटेलपेक्षाही अत्यंत सुंदर असल्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतं. 6 / 7हॉलंड येथील बस स्थानक हे 2003 साली तयार करण्यात आले असून ते त्याच्या इंटेरिअर डिझाईन करता अत्यंत प्रसिद्ध आहे. सिंथेटिक पॉलिएस्टरचा वापर करून हे अप्रतिम बस स्थानक बांधण्यात आले आहे. 7 / 7लंडन येथील वॉक्सल हे बस स्थानक पूर्णपणे स्टेनलेस स्टीलने तयार करण्यात आलेले आहे. 2005 साली तयार करण्यात आलेले हे बस स्थानक अत्यंत सुंदर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications