Worlds coldest village oymyakon siberia
जगातलं सर्वात थंड गाव, इथे पाणीच काय, पाहता पाहता माणसेही गोठतात! By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:06 PM1 / 11सध्या थंडीचं वातावरण असल्याने सगळीकडे थंडीची आणि थंड ठिकाणांची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी जगातल्या सर्वात थंड ठिकाणाबाबत माहिती घेऊन आलो आहोत. हे ठिकाण रशियातील सायबेरियामधील एक छोटसं गाव आहे. 'ओइमाकॉन' असं या गावाचं नाव असून या गावाची लोकसंख्या केवळ ५०० इतकी आहे. या सायबेरियन गावाला स्थायी रुपाने सर्वात थंड आणि वसलेलं गाव मानलं जातं. थंडीच्या मौसमात येथील तापमान -६२ डिग्री सेल्सिअस इतकं खाली आलं होतं. पण अशात थंडीतही येथील लोक त्यांचं जीवन जगत आहेत. 2 / 11ओइमाकॉन हे गाव रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला ३ हजार मैल दूर आहे. बर्फाची चादर ओढलेल्या या गावात दूर दूरपर्यंत कुठेच हिरवं मैदान बघायला मिळत नाही. या गावाच्या नावातही एक गंमत आहे. म्हणजे ओइमाकॉन चा अर्थ अशी जागा जिथे पाणी गोठलं जात नाही. पण मजेदार बाब म्हणजे या ठिकाणा पाणी काय माणसही बघता बघता गोठतात. 3 / 11जानेवारी महिन्यात येथील सरासरी तापमान हे - ५० डिग्रीच्या जवळपास असतं. येथील सर्वात कमी तापमान -७१.२ डिग्री सेल्सिअस रेकॉर्ड केलं गेलं होतं. त्यामुळे ओइमाकॉनला 'Pole of Cold' म्हणजेच थंड ध्रुव म्हटलं जातं. कधी कधी इथे सूर्यही दिसतो तेही थंडी कमी असताना. पण सूर्याची गरमी लोकांना अजिबात जाणवत नाही. 4 / 11१९३३ मध्ये या गावातील तापमान -६७.७ डिग्री नोंदवलं गेलं होतं. गेल्यावर्षी २२ डिसेंबरला -५८ डिग्री तापमान नोंदवण्यात आलं होतं. एकीकडे जगभरात जिथे थंडीची लाट आली आहे, तिथे दुसरीकडे या गावात थंडीचा प्रभाव अधिकच बघायला मिळत आहे. 5 / 11ओइमाकॉनचा इतिहासही अजब आहे. १9२० ते १९३० दरम्यान हे ठिकाण सैनिकांसाठी काही वेळ थांबण्याची जागा होतं. नंतर सोविएत सरकारने येथून नोमॅडिक लोकांना नियंत्रित करण्याच्या दृष्टीने इथे गाव वसवलं. 6 / 11एकदा न्यूझीलॅंडचा फोटोग्राफर Amos Chapple ने या गावाला भेट दिली होती. येथील काही फोटोंसह त्याने काही खास गोष्टीही शेअर केल्या होत्या. त्याने फोटो काढताना कॅमेराची लेन्स गोठल्याचाही उल्लेख केला होता.7 / 11एकदा न्यूझीलॅंडचा फोटोग्राफर Amos Chapple ने या गावाला भेट दिली होती. येथील काही फोटोंसह त्याने काही खास गोष्टीही शेअर केल्या होत्या. त्याने फोटो काढताना कॅमेराची लेन्स गोठल्याचाही उल्लेख केला होता.8 / 11एकदा न्यूझीलॅंडचा फोटोग्राफर Amos Chapple ने या गावाला भेट दिली होती. येथील काही फोटोंसह त्याने काही खास गोष्टीही शेअर केल्या होत्या. त्याने फोटो काढताना कॅमेराची लेन्स गोठल्याचाही उल्लेख केला होता.9 / 11एकदा न्यूझीलॅंडचा फोटोग्राफर Amos Chapple ने या गावाला भेट दिली होती. येथील काही फोटोंसह त्याने काही खास गोष्टीही शेअर केल्या होत्या. त्याने फोटो काढताना कॅमेराची लेन्स गोठल्याचाही उल्लेख केला होता.10 / 11एकदा न्यूझीलॅंडचा फोटोग्राफर Amos Chapple ने या गावाला भेट दिली होती. येथील काही फोटोंसह त्याने काही खास गोष्टीही शेअर केल्या होत्या. त्याने फोटो काढताना कॅमेराची लेन्स गोठल्याचाही उल्लेख केला होता.11 / 11एकदा न्यूझीलॅंडचा फोटोग्राफर Amos Chapple ने या गावाला भेट दिली होती. येथील काही फोटोंसह त्याने काही खास गोष्टीही शेअर केल्या होत्या. त्याने फोटो काढताना कॅमेराची लेन्स गोठल्याचाही उल्लेख केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications