This year, in Mumbai on 31st, then it is here to go
यंदा 31st ला मुंबईत ? मग इथं फिरायलाच हवं By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 3:51 PM1 / 10अॅडलॅब इमॅजिका हा भारतातील सर्वात मोठा थीम पार्क इव्हेंट आहे, तुम्ही 31st येथे जाऊन साजरा करू शकता. 2 / 10नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीसाठी अलिबाग हेही उत्तम ठिकाण आहे. निसर्गरम्य समुद्राच्या तिरी तुम्ही 31st चा मनमुराद आनंद घेऊ शकता. 3 / 10नववर्षाच्या स्वागताला बॉलिवूडच्या टॉप डीजेसंग नाचायचंय तर Essel world बेस्ट पर्याय आहे. 4 / 10गेट वे ऑफ इंडियाजवळ जाऊन बोटींगद्वारे नववर्षाचं स्वागत करण्यात वेगळीच मजाय, समुद्राच्या निळसर पाण्यात सरत्या वर्षाला निरोप द्या.5 / 10मुंबईत येणाऱ्यानं मरीन ड्राईव्हला फिरायलाच हवं, समुद्राच्या काठावर खळखळणारं ते पाणी पाहायलाच हवं. 6 / 10समुद्राकाठी म्हटलं की कुठल्या बीचवर फिरायचं हा प्रश्न आलाच, मग बीचवर जायचंय तर पाली बीज एकदम झक्कास...7 / 10लोणावळ्यातील पवना लेकजवळ तुम्ही तंबू टाकून वन डे ट्रीपचं आयोजन करू शकता. नववर्षाचं स्वागत असही करता येईल. 8 / 10हजार-बाराशे रुपयात एका व्यक्तीसाठी खायचं अन् राहायचं ठिकाणं म्हणजे प्रबलमाची निसर्गरम्य ठिकाण. 9 / 10लोणावळ्यात जाऊन स्कायवाल्ट बलूनची सफारीही भन्नाट अनुभव राहिला. अविस्मरणीय असा तो क्षण राहिल. 10 / 10तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर तुमच्या 31st हा निसर्गाच्या सानिध्यातच द मचन या इकोफ्रेंडली रेस्टॉरंटमध्ये साजरा करता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications