400 kg lock, 4 feet key, cost to make for Ram temple, made by aligarh man
राम मंदिरासाठी ४०० किलोंचं कुलूप, ४ फूट चावी; बनवण्यास एवढा खर्च By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 3:26 PM1 / 10अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील राम मंदिरासाठी मोठे कुलूप बनवण्यात आले असून अलिगढ येथील एका कारागिराने हे कुलूप बनवले आहे. 2 / 10गेल्या ४५ वर्षांपासून हस्तनिर्मित कुलूप बनवण्याचं काम हे कारागिर करत आहेत. राम मंदिरासाठी त्यांनी बनवलेल्या कुलूपाचे वजन तब्बल ४०० किलो एवढे असून त्याची चावी ४ फूट लांब आहे. 3 / 10त्यामुळे, या कुलूपाची आणि कारागिराचीही चर्चा होत आहे. प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी एक युनिक कुलूप बनवण्यात यावं, याच उद्देशाने आपण ह्या कुलूपाची निर्मित्ती केल्याचं त्यांनी सांगितलं. 4 / 10प्रभू श्रीराम यांचे भक्त असलेल्या सत्य प्रकाश शर्मा यांनी हे कुलूप राम मंदिरासाठी बनवलं आहे. 5 / 10 श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, मोठ्या संख्येने भाविक भक्त राम मंदिरासाठी काही ना काही भेटवस्तू किंवा देणगी देत आहेत. त्यामुळे, या कुलूपाचा उपयोग कुठं करता येईल, हे पाहिले जाईल, असेही ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.6 / 10अलीगढला ताला नगरी किंवा तालों की भूमी म्हणजे कुलूपांचं शहर म्हणून संबोधलं जातं. या अलीगढमध्येच सत्य प्रकाश शर्मा हे पिढीजात कुलूप बनवण्याचं काम करत आहेत. 7 / 10सत्यप्रकाश यांनी बनवलेल्या या कुलूपाचे वजन ४०० किलो असून यासाठीची चावी ४ फूट लांब आहे. हे कुलूप १० फूट उंच, ४ फूट रुंद आणि ९.५ फूट उंच आहे. 8 / 10या कुलूपाला अलीगढमध्ये दरवर्षी लावण्यात येणाऱ्या प्रदर्शनात ठेवले जाणार आहे. माझ्या प्रेमाचं आणि कष्टाचं उदाहरण हे कुलूप आहे. त्यासाठी माझ्या पत्नीनेही मेहनत घेतली आहे. त्यामुळे, हे कुलूप एकदम योग्य ठिकाणी असावं, अशी इच्छाही सत्य प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. 9 / 10दरम्यान, हे कुलूप बनविण्यासाठी २ लाख रुपयांचा खर्च आल्याचे त्यांच्या पत्नी रुक्मिणी यांनी म्हटलं आहे. स्वखर्चातून त्यांनी हे कुलूप बनवले असून हा आयुष्यातील स्वप्नव्रत असल्याचेही त्यांनी सांगितले. 10 / 10दरम्यान, पुढील वर्षी जानेवारी महिन्यात २१, २२ आणि २३ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. त्यासाठी, देशभरातून भाविक उत्साही आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications